येवल्यात चौसष्ट वर्षांनंतर सुटले शेतमाल लिलावाचे ग्रहण!

तब्बल ६४ वर्षं झाली, अमावस्या आली की बाजार समितीला सुट्टी अन्‌ लिलाव बंद हे गणित ठरलेले होते. यावर झालेले आक्षेप व तक्रारीनंतर अखेर शेतकरी हितासाठी अंधश्रद्धेचे ग्रहण सोडवत सोमवारी पासून येथील बाजार समितीत लिलावाला सुरवात झाली. यापुढे प्रत्येक अमावस्येला सुट्टी न घेता येथील लिलाव सुरूच राहतील, असे मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांनी सांगितले.
येवल्यात चौसष्ट वर्षांनंतर सुटले शेतमाल लिलावाचे ग्रहण!
Yeola market

येवला : तब्बल ६४ वर्षं झाली, अमावस्या आली की बाजार समितीला सुट्टी अन्‌ लिलाव बंद हे गणित ठरलेले होते. (From last 64 years Actions being closed on Amavasya is a tradition)  यावर झालेले आक्षेप व तक्रारीनंतर अखेर शेतकरी हितासाठी (After many complains from farmers) अंधश्रद्धेचे ग्रहण सोडवत सोमवारी (Auction starts from monday) पासून येथील बाजार समितीत लिलावाला सुरवात झाली. यापुढे प्रत्येक अमावस्येला सुट्टी न घेता येथील लिलाव सुरूच राहतील, असे मुख्य प्रशासक वसंतराव पवार (Vasantrao Pawar) यांनी सांगितले. 

बाजार समितीची स्थापना १९५५ रोजी झाली असून, प्रत्यक्ष कामकाज १९५७ मध्ये सुरू झालेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत अमावास्येला बाजार समितीत कांदा, मका व भुसार धान्याचे लिलाव बंद राहत होते. मात्र, शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करुन बाजार समितीने ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढून यापुढे प्रत्येक अमावास्येला इतर बाजार समित्यांप्रमाणे शेतमाल लिलाव चालू ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेवरून अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. 

सोमवारी अमावास्येला पोळा सणाच्या मुहुर्तावर कांदा व भुसार धान्य लिलावाचा शुभारंभ येवल्यात बाळासाहेब लोखंडे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, तर अंदरसूल उपबाजारात प्रशासक किसन धनगे, मकरंद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य आवारात शेतकरी विष्णू चव्हाण, तर अंदरसूल उपबाजारात शेतकरी ठकुनाथ खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी प्रशासक समीर देशमुख, शरद शिंदे, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, भानुदास जाधव, सचिव के. आर. व्यापारे, व्यापारी नंदकिशोर आट्टल, सुभाष समदडीया, प्रदीपचंद्र गुजराथी, संतोष आट्टल, सुमित समदडीया, उमेश आट्टल आदी उपस्थित होते. 

...
अनेक वर्षाची परंपरा असल्याने याबाबत सर्वानुमते चर्चा करून लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत सूचना केल्या होत्या. हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. आता नियमितपणे अमावस्येलाही लिलाव सुरू राहतील. 
- बाळासाहेब लोखंडे, भुजबळ संपर्क कार्यालय प्रमुख, येवला  

Related Stories

No stories found.