
पाथर्डी : ॲड. प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांच्या तीन पिढ्यांचा संघर्ष मी पाहतोय. राष्ट्रवादीत जो संघर्ष करतो, त्याला न्याय मिळतो. ॲड. प्रताप ढाकणे यांच्या राजकीय पुर्नवसनासाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्याशी बोलुन प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार रोहीत पवार यांनी दिली. (Adv. MLA Rohit Pawar will try to rehabilitate Pratap Dhakne)
येथील संस्कारभवनात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण व ॲड. प्रताप ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. ॲड. प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परीषद सदस्य प्रभावती ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सभापती डॉ. क्षितीज घुले, गहीनीनाथ शिरसाट, ऋषीकेश ढाकणे, किरण शेटे, बंडु बोरुडे, बाळासाहेब ताठे, योगेश रासणे, सिद्धेश ढाकणे, बन्सीभाऊ आठरे, चाँद मणियार, राजेंद्र खेडकर उपस्थित होते.
पवार म्हणाले, की कर्जत-जामखेडच्या विकासाचे काम करतोय. तशीच परिस्थिती पाथर्डी-शेवगावची आहे. विकासाच्या कामाला ॲड. ढाकणे यांना सोबत घेवुन काम करु. शेवगावला चंद्रशेखर घुले व पाथर्डीत प्रताप ढाकणे यांचे चांगले कार्य आहे. गेल्या वेळी भाजपाने जातीपातीचे राजकारण केल्याने ढाकणेंना निसटता पराभव स्विकारावा लागला. जनेतेनेही विकास ज्याला समजतो त्यालाच निवडुण द्यावे. नगर परीषद, पंचायत समिती व जिल्हा परीषदेत पक्षाला चांगली मदत करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले, पाथर्डी तालुक्याला कोणी वाली राहीला की नाही अशी अवस्था आहे. कार्यकर्ते सैरभैर आहेत. आपल्याला सावरावे लागेल, खंबीर रहावे लागेल. मी सत्तेसाठी लाचार होणारा माणुस नाही. महाराष्ट्र रोहीत पवाराकडे आशेने पाहतोय. तुम्ही पाण्याचा प्रश्न व विकासाच्या कामासाठी आम्हाला मदत करा. मी राष्ट्रवादीत आलो, तो पक्ष सोडण्याचा माझा निर्णय चांगलाच होता. भाजपात आमच्या भगिनी (पंकजा मुंडे) व नाथाभाऊ खडसे यांचे काय झाले तुम्ही पहात अहात ना?, जनेतेचे प्रेम हेच माझ्यासाठी सर्वोच्च आहे. ऋषीकेश ढाकणे यांनी प्रस्ताविक तर विना दिघे व उद्धव काळापहाड यांनी सुत्रसंचालन केले.
मराठा व ओबीसी आरक्षण हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी केंद्राला पत्र पाठवुन ईडीची चौकशी लावण्याचे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत का केंद्राला पत्र पाठविले नाही, हे राजकारण करतात. विकास कोण करतोय ते पहा आणि मगच राजकारणात सहभागी व्हा, असे रोहीत पवार यांनी सांगितले.
हेही वाचा..
Edited By - Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.