आपद्‌ग्रस्तांना पालकमंत्री परबांनी दिलेले मदतीचे धनादेश परत घेतले

दुसऱ्‍याच दिवशी तलाठी पाठवून ते धनादेश परत घेण्यात आले.
The administration withdrew the aid checks given to the victims
The administration withdrew the aid checks given to the victims

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावी कोसळलेल्या दरडीखाली सापडून ८ घरांतील १७ लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर आपदग्रस्तांना पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या हस्ते दिलेले धनादेश प्रशासनाने दुसऱ्‍या दिवशी परत घेत आपद्ग्रस्तांची चेष्टा केल्याचे बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (The administration withdrew the aid checks given to the victims)

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयरे म्हणाले की, ता. २८ जुलै रोजी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी पोसरे गावाला भेट दिली. त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांचे धनादेश देण्यात आले. पण, दुसऱ्‍याच दिवशी तलाठी पाठवून ते धनादेश परत घेण्यात आले. 

त्यावेळी संबंधितांनी सांगितले की, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. आपद्ग्रस्त कुटुंबासोबत असे कृत्य करणे म्हणजे त्यांची कुचेष्टा आहे. या घटनेची जिल्हाधिकाऱ्‍यांनी गंभीर दखल घेऊन त्वरित शासकीय मदत आपद्ग्रस्त कुटुंबांना द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पालकमंत्री परब यांनी केवळ फोटोसाठी मदत वितरण केल्याचा शो केल्याचा आरोपही आयरे यांनी या वेळी बोलताना केला.

दरम्यान, खेड तालुक्यातील पोसरे दरडग्रस्त कुटुंबावर शासन-प्रशासन अन्याय करत आहे. त्यांच्या सुविधांबाबत गांभीर्य नाही, अशी व्यथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्यापुढे बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्‍यांनी मांडली. पोसरेतील कुटुंबातील लोकांना दिलेले चार लाखांचे धनादेश परत घेतल्याचा जाबही त्यांनी विचारला.

निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांची भेट घेऊन बसपा प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, प्रेमदास गमरे, राजू जाधव, अनंत पवार, डी. आ. जाधव, बबलू जाधव आणि अनिकेत पवार यांनी चर्चा केली. पुनर्वसन करताना पोसरे येथेच कायमस्वरूपी घरे द्यावीत, अशी मागणी केली. त्या जागेचा सर्व्हे करुन निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांना देण्यात आले. 

अंत्यसंस्कार करताना वेगळी मानसिकता दाखवली जात असल्याचे आयरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री गुहागरहून रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाच्या हॅलिपॅडवर उतरुन ४५ ते ५० किलोमीटर अंतरावर चिपळूणला पूरग्रस्त भागात पाहणी करून गेले. पण चिपळूणवरुन ३० किलोमीटरवर असणाऱ्‍या पोसरेमध्ये 17 लोक मृत्युमुखी पडले, ही गंभीर बाब मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्षित केले, याचा बसपतर्फे निषेध करण्यात आला. 

सोळा कुटुंबांना मिळणार सोळा घरे

खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडीमध्ये दरड कोसळून सात कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन चिपळूण येथील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीमध्ये करताना १६ कुटुंबातील लोकांना ८ घरे देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सोनावणे यांनी सांगितले होते. १६ कुटुंबातील लोकांना १६ घरे देण्यात यावीत, अशा सूचना देण्यात येणार असल्याचे भडकवाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in