अनिल परब यांच्या प्रकरणांबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...  

आनंदाने आम्ही कुठलेही निर्बंध लावले नाही. आपल्याकडचे कोरोना व्हेरियंट अतिशय धोकादायक आहे.
 Aditya Thackeray .jpg
Aditya Thackeray .jpg

मुंबई : मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरांतील काही भागात १३ व १४ जूनला अतिवृष्टी (Heavy Rainfall) होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबईत रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी मुंबईतील समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.  (Aditya Thackeray said about Anil Parab)

ते मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, पाऊस जास्त आहे अलर्ट दिलेला आहे. प्रत्येकाने काळजी घ्या. शक्यतो घराबाहेर पडू नका. विरोधक हे विरोध करणारेच आहेत ते प्रत्येक ठिकाणी विरोध करत असतात. भूमिगत टाक्यांसह विविध गोष्टी आपण सध्या करत आहोत. मुंबईत कमीत कमी पाणी साचले पाहीजे यासाठीचा सध्या प्रयत्न सुरू आहे. पर्यावरण बदलत असल्यामुळे पाऊस अधीक पडतो आहे. या सगळ्या गोष्टी पाहून पुढील उपाययोजना करत आहोत. सर्व लोकप्रतिनिधी महाविकास आघाडीचे नेते सध्या काम करत आहेत, असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भाजपकडून विविध आरोप करण्यात येत आहेत. त्यातच त्यांच्या रिसॅार्टची चौकशी सध्या सुरु आहे, त्या विषयी ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की अनिल परब यांच्या प्रकरणांमध्ये माहिती घेऊन मला बोलावे लागेल. मी अजून माहिती घेतली नाही. सध्या राजकारणाबाबत मी बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनामुळे झालेल्या लॅाकडाऊन बाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले आनंदाने आम्ही कुठलेही निर्बंध लावले नाही. आपल्याकडचे कोरोना व्हेरियंट अतिशय धोकादायक आहे. सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. अजूनही धोका कमी झालेला नाही. 'बेड आहेत...त्यांची क्षमता जास्त आहे, त्याविषयी काम चालू आहे.  

दरम्यान, पाण्याचा उपसा करणारी सहा उदंचन केंद्रे विविध ठिकाणी बसवण्यात आली आहेत. ती कार्यरत असल्याची खातरजमाही करण्यात आली आहे. तसेच, अग्निशमन दलाची पूर आणि बचावपथके मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांची पथकेही सज्ज आहेत. शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी बेस्ट आणि अदानी एनर्जी यांच्या पथकांनाही दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, आरोग्य विभागालाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मुंबई महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

मुंबईत मिठी नदीच्या पाणीपातळीत पावसामुळे मोठी वाढ होत आहे. यामुळे क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येत आहे. तसेच, एनडीआरएफची एक तुकडी त्या परिसरात तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या २४ विभागांतील शाळांमध्ये नागरिकांसाठी तात्पुरते निवारे निश्चित करण्यात आले आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in