शिक्षिकेवर बलात्कार करणारा रिटायर्ड एसीपी निघाला किराणा दुकानदार

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली होती.
शिक्षिकेवर बलात्कार करणारा रिटायर्ड एसीपी निघाला किराणा दुकानदार
The accused rapist is not an ACP but a grocery shopkeeper .jpg

पिंपरी : रिटायर्ड एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त) असल्याने माझे कोणी वाकडे करू शकत नाही, असे धमकावत एका शिक्षिकेवर बलात्कार करणारा ६५ वर्षीय नराधम विकास अवस्थी हा प्रत्यक्षात किराणा दुकानदार (grocery shopkeeper) निघाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांत सांगवी (Sangvi) पोलिसांनी मोबाईलवरून माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, अटक झाल्यानंतर आरोपीचा बीपी वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून तूर्त पोलिसांनी स्व;ताहून त्याची न्यायालयीन कोठडी घेतली आहे. (The accused rapist is not an ACP but a grocery shopkeeper)

मुंबईतील 'निर्भया'ची संतापजनक घटना ताजी असतानाच शहरातही हा घृणास्पद प्रकार घडल्याने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली होती. त्यात आरोपीने पोलिस अधिकारी असल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे दुप्पट वेगाने सांगवी पोलिसांनी तपास सुरु केला. 

कसलाही धागादोरा हाती नसताना फक्त आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांनी आरोपीचा मागमूस शोधला. दरम्यान, आरोपी हा रिटायर्ड एसीपी नसल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त (वाकड विभाग) श्रीकांत दिसले आणि सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी खात्री करून घेतली होती. बलात्कारासह अवैध सावकारीचाही गुन्हा आरोपीविरुद्ध पोलिसांना नोंदवला होता. असाच बेकायदेशीर सावकारीसह खंडणी आणि जमीन हडपण्याचे गुन्हे डबल मोका लागलेले उद्योगपती गायकवाड पितापूत्रांविरुद्ध याच पोलिस ठाण्यात दाखल आहेत. 

डिसेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२१ दरम्यान हा गुन्हा घडला होता. मात्र, त्याबाबत शुक्रवारी (ता.१०) सदर शिक्षिकेने तक्रार दिल्याने उशीराने गुन्हा दाखल झाला. या फिर्यादी शिक्षिकेला पैशाची नड होती. त्यामुळे त्यांनी आरोपीकडून वीस हजार रुपये कर्ज घेतले. त्याचे महिन्याला ती दोन हजार रुपये व्याज देत होती. म्हणजे महिन्याला दहा टक्के पठाणी व्याज आरोपी घेत होता. तसेच कर्ज देताना त्याने दोन कोरे धनादेश आणि इतर दोन कागदावरही या महिलेच्या सह्या घेतल्या होत्या. 

पिंपळे गुरवमधील डायनासोर गार्डनजवळील आपल्या घरी त्याने या शिक्षिकेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रथम लैंगिक अत्याचार केला. तिचे विवस्त्रास्थेतील फोटो काढले. ते तिच्या शाळेत आणि घरी दाखवण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. ओरडली, तर तुला व घरच्यांनाही मारून टाकण्याची धमकी या आरोपीने दिली होती. तसेच मी रिटायर्ड एसीपी असून माझे कोणी वाकडे करू शकत नाही, असेही त्याने धमकावले होते. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.