प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला वेग द्या - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

नगर महापालिकेच्या हद्दीतील नालेगाव, आगरकर मळा, केडगाव, संजय नगर येथील प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

नगर ः प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत येणाऱ्या घरकुल योजनेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा. पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळेल याची दक्षता घ्या. संथगतीने सुरू असलेल्या या कामाला वेग द्या, असे निर्देश खासदार डॉ सुजय विखे पाटील ह्यांनी दिले. Accelerate the work of Pradhan Mantri Awas Yojana - MP Dr. Sujay Vikhe Patil

नगर महापालिकेच्या हद्दीतील नालेगाव, आगरकर मळा, केडगाव, संजय नगर येथील प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या प्रसंगी ते बोलत होते. महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक निखील वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, सचिन जाधव, आयुक्त शंकर गोरे आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा...

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काचे घरकुल मिळावे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची आखणी केली आहे. योजनेच्या निधीतील उपलब्धता तसेच येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात मुंबईतील म्हाडा कार्यालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, त्यामुळे आपल्या अधिकार क्षेत्रातील अडचणी प्रशासनाने तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, ज्या अडचणी संदर्भात सरकार दरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

हेही वाचा...

महापालिकेचे सध्या केडगाव व नालेगाव अशा दोन ठिकाणच्या प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार खासदार डॉ. विखे पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री आवास योजने संदर्भातच खासदार डॉ. विखे पाटील यांनी गुरुवारी (ता. 19) जिल्हा परिषदेतही बैठक बोलावली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in