तहसिलदार सचिन लंगोटे यांना खाली पाडून जबर मारहाण; आटपाडीत वाळू तस्कर माजले! 

तहसिलदार सचिन लंगोटे यांना खाली पाडून जबर मारहाण; आटपाडीत वाळू तस्कर माजले! 

आटपाडी (सांगली) : देशमुखवाडी येथे तिघा वाळू तस्करांनी धुमाकूळ घालत महसूल पथकावर जोरदार हल्ला केला. तहसीलदार सचिन लंगोटे यांना जबर मारहाण झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताचे बोट मोडले आहे. पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. पथकातील अन्य कर्मचारीही जखमी झालेत. 

तहसीलदार श्री. लंगोटे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अलंकार खरात, किसन मोटे आणि सचिन मोटेंवर गुन्हा दाखल झाला आहे. एका हल्लेखोराला अटक झाली आहे. घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात एकत्र येऊन निषेध नोंदवला. कामकाज बेमुदत बंद ठेवून वाळू तस्करांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. 

तालुक्‍यात वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माणगंगा नदीपात्र, आटपाडी, निंबडवे येथील तलाव आदी ठिकाणहून राजरोस वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्करीत तालुक्‍यातील जवळपास दोनशेंवर युवक अडकलेत. यापूर्वी महसूल कर्मचाऱ्यांवर तस्करांचे हल्ले झाले होते. आज मात्र वाळू तस्करांनी देशमुखवाडी येथे धुमाकूळ घातला. बोंबेवाडी येथे वाळू भरून ट्रॅक्‍टर निघाला असल्याची माहिती कळाल्यामुळे पहाटे पाच वाजता तहसीलदार श्री. लंगोटे, कर्मचाऱ्यांसह पथकासोबत कारवाईसाठी गेले. 

देशमुखवाडीतील भानुसे वस्तीवर वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर चालला होता. श्री. लंगोटे यांनी अटकाव करून त्यांना रोखले. चालक अलंकार शिवाजी खरातकडे ते चौकशी करीत होते. तेवढ्यात मोटारीतून (एम एच 10 एजे 5057) मधून ट्रॅक्‍टर मालक किसन सदाशिव मोटे, त्यांचा मुलगा सचिन मोटे तहसीलदारावर धावून गेले. त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. तहसीलदार श्री. लंगोटे यांना खाली पाडून त्यांना बेदम मारहाण झाली. पथकातील कर्मचारी धावून गेले. तर त्यांनाही वाळू भरत असलेल्या अन्य तस्करांनी मारहाण सुरू केली. मोठा गोंधळ झाला. श्री. लंगोटे यांच्या डाव्या हाताचे करगंळीचे बोट मोडले आहे. उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. महसूलचे अन्य कर्मचारीही जखमी झालेत. 
त्यानंतर तहसीलदार लंगोटेंनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. 

'सरकारनामा' मोबाईल अॅप
अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा

iPhone वर 'सरकारनामा' वाचा

अँड्रॉईड अॅपची लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama&hl=en

iOS अॅपची लिंक:
https://itunes.apple.com/gb/app/sarkarnama/id1282880016?mt=8 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in