कोरोनाचे समूहसंक्रमण झाल्याचे सांगितले जात असताना परीक्षा कशासाठी?: तांबे - youth congress leader satyajeet tambe opposes third year exam issue | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचे समूहसंक्रमण झाल्याचे सांगितले जात असताना परीक्षा कशासाठी?: तांबे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 जुलै 2020

दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. देशभरात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले असून एकट्या महाराष्ट्रातच यापैकी 3 लाखाचा आकडा पार झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. देशभरात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले असून एकट्या महाराष्ट्रातच यापैकी 3 लाखाचा आकडा पार झाला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या तर एकूणच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. समूह संक्रमणाचा धोका बघता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, विद्यार्थ्यांकडून परिक्षाशुल्क घेऊ नये आणि मागील सत्राच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करावा, या तीन मागण्या युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे  केल्या आहेत.

भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूचे समूहसंक्रमण सुरू झाले आहे, असा दावा विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी केला असताना देखीलपरीक्षा घेण्याचे आदेश काढणे म्हणजे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व कुटुंबीयांचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असे यावेळी तांबे यांनी सांगितले.

संजय राऊतांचा ठाकरेंना पहिला प्रश्न!

पुणे :  'सामना'चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखती नंतर 'संजय राऊत विथ उद्धव ठाकरे या "काय म्हणतय ठाकरे सरकार"… या अनकट मुलाखतीत राऊत यांनी ठाकरे यांना पहिलाच प्रश्न 'तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेत का? हा विचारला आहे. 

25 आणि 26 जुलैला प्रसिद्ध होणाऱ्या बहुचर्चीत मुलाखतीचा प्रोमो आज प्रकाशित करण्यात आला. या मुलाखतीत संजय राऊत यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना विविध प्रश्न विचारत मुलाखतीची उत्कंठा वाढविली आहे. विविध प्रश्नांमध्ये राऊत यांनी पहिलाच प्रश्न आपल्या डोक्यावरील केस कमी झालेत हा गेल्या सहा महिन्यातील परिणाम आहे का? असं विचारत वातावरण हलके फुलके करत ठाकरे यांना मनमोकळं करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी देखील या प्रश्नाला हसुन दाद देत वातावरण हलके केले. 

विविध प्रश्नांमध्ये आपण सहा महिन्यांकडे कसे पाहता...कोरोना संकटात महाराष्ट्रात सैन्याला पाचारण कराव अस वाटल कां...मंत्रालयात कमीत कमी गेलात यावर आपल्यावर टीका झाली...तुम्हाला कोरोना वर डॉक्टरेट मिळावी...तुम्ही काही तरी लपवताय का?… मुंबईत वडापाव कधी मिळणार...आदि प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले आहेत. 

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख