सुशांत, हिमांशू रॅाय, भय्यू महाराज यांनी तो क्षण टाळला असता तर.... - What are the reasons behind the suicide of Sushant Himanshu Rai and Bhaiyu Maharaj | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत, हिमांशू रॅाय, भय्यू महाराज यांनी तो क्षण टाळला असता तर....

मंगेश महाले
सोमवार, 15 जून 2020

सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय, आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली होती.   

पुणे : गेल्या काही वर्षात सेलिब्रेटीच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यामागील कारणे काय असू शकतील, हा प्रश्न आहे. बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक कारणांमुळे होत असतात, पण सेलिब्रेटीच्या आत्महत्येमागे आर्थिक कारण असू शकत नाही. आपल्या क्षेत्रात टिकून राहणे, वरिष्ठांकडून त्रास, स्पर्धक, अशी अनेक कारणे यामागे असण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा सेलिब्रेटीच्या आत्महत्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय, आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली होती.   

एटीएस प्रमुख हिमांशू रॉय 

कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली. ही घटना 11 मे 2018 रोजी घडली होती. कॅन्सरला कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. त्यांना लगेचच एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वी त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे डॅाक्टरांनी जाहीर केले. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येते. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते. सगळ्या सहकाऱ्यांशी चांगले सबंध असलेले, बॉडी बिल्डर अधिकारी अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती. तदुंरस्त राहण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. त्यांनी सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. ते १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या तपासामुळेच २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी  विंदू दारा सिंगला अटक  झाली होती.  

 
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज 

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी 12 जून 2018 रोजी आपल्या इंदूर येथील निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. कौटुंबिक भांडणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जाते. तणावाखाली असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे भय्यू महाराज यांनी सूसाईट नोटमध्ये म्हटले होते. विविध क्षेत्रातील अनेक जणांशी  भय्यु महाराज यांची चांगली मैत्री होती. त्यांच्या आश्रमात अनेक क्षेत्रातील व्हीआयपी नेहमी येत असायचे. सिनेमा, राजकारण, सामाजिक कार्य असे अनेक क्षेत्रांमध्ये  भय्यू महाराज सक्रिय होते. त्यांना आलिशान गाड्यांची हैास होती. ते आध्यामिक क्षेत्रात असले तरी कधीही भगव्या कपड्यात नसायचे. त्यांचा पेहराव असायचा. 

 

 

सुशांत सिंह राजपूत 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी (ता.14) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तो 34 वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच त्याच्या माजी व्यवस्थापिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला 'किस देश मे है मेरा दिल' ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. नंतर त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. सुशांतचे काही चित्रपट हिट ठरले होते, पण त्यानंतरही त्यांच्या हातात मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट नव्हता.  'छिछोरे' सारखा त्यांचा शेवटचा सिनेमा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तरीही या मुंबईच्या माया नगरीमधील अनेक मोठ्या बॅनर, निर्मात्यांनी त्यांच्यावर कळतनकळत बहिष्कार टाकला होता. सुशांत हा अभिनेता शाहरूख खान आणि अक्षयकुमार सारखा  या बॅालिवुडमध्ये 'आऊटसाईडर' होता. बॅालिवुडमधील काही कळप त्याला चित्रपट मिळू नये म्हणून सारखे प्रयत्नशील असायचे, अशीच सध्या चर्चा आहे.

अनेक मानसोपचार तज्ञ अशा आत्महत्या रोखण्यासाठी संबंधित व्यक्तीची अस्वस्थता त्याच्या आजुबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींनी लक्षात घेणे महत्त्वाचे असते. तो क्षण की त्यासाठी ते एकटे राहतात, एकांतात जाण्याचा प्रयत्न करतात तो जर टाळला तर अनेक आत्महत्या रोखू शकतात, असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

.ज्यादा इंपोर्टेंट है तो वो है खुद की जिंदगी...
एका व्यक्तीने आत्महत्या केली तर त्यांच्या आत्महत्येमागे किमान पाच, सहा जणांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. आत्महत्या केलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा विमा लागू होत नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहतात. एखाद्या व्यक्तीने जर आत्महत्येचे दृश्य पाहिले तर ती व्यक्ती ते दृश्य अनेक वर्ष विसरू शकत नाही. अशा व्यक्तींना मानसिक आजार होण्याची शक्यता असते. अनेक घटना, विचार एकत्र आल्यानंतर व्यक्ती आत्महत्येचा विचार करतो. किती तरी गोष्टी एकत्र आल्यामुळे व्यक्ती आत्महत्येचा विचार करते. जागतिकीकरण, उदारीकरण, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपला विकास होत असला तरीही विविध समस्याही वाढत आहेत. आत्महत्या या दुदैवी घटनेस जगाच्या पाठीवर कोणीही समाज, धर्म अपवाद नाही. वाढत्या तणावामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे का ? सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणामुळे आत्महत्या होत असतात. याला कोणीही अपवाद नाही. पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की "जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपोर्टेंट है तो वो है खुद की जिंदगी..."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख