अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत 'या' दोन आमदारांमध्ये रंगले टि्वटर  वॉर - Twitter war between two MLAs over 'final' exams | Politics Marathi News - Sarkarnama

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत 'या' दोन आमदारांमध्ये रंगले टि्वटर  वॉर

गणेश कोरे
शनिवार, 18 जुलै 2020

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांच्यात टि्वटर युद्ध सुरु झाले आहे.

पुणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांच्यात टि्वटर युद्ध सुरु झाले आहे. यात पवार यांनी सडेतोड उत्तर देत "इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय! राजकारणाशिवाय आपल्याला दुसरं काही बोलताच येत नसेल तर शांत बसलेलंच अधिक योग्य राहील," असा सल्ला दिला आहे. आता रोहित यांच्या सल्ल्याला भातखळकर काय उत्तर देणार याकडे नेटकऱ्याचे लक्ष लागले आहे.

विद्यापाठीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत महाविकास आघाडी ठाम असून, या प्रश्‍नी भाजपा विविध मार्गांनी सरकारला धारेवर धरत आहे. याबाबत एक दिवसापुर्वी आमदार रोहित पवार यांनी कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या युजीसी च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये.प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात. असे ट्वीट केले होते. हे ट्टवीट युजीसीच्या अधिकाऱ्यांना उद्देशुन केले होते.

मात्र या टि्वट्चा धागा पकडत भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळखर यांनी, "तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे ? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक आहे ना ?" असे खोचक टि्वट करत आपण मुख्यमंत्र्यांना उद्देशून तर ट्वीट केले नाही ना, असा चिमटा काढला.

यावर रोहित पवार शांत बसले नाही त्यांनी भातखळकर यांना सडेतोड उत्तर दिले ते म्हणतात, "इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय ! विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा तुम्हाला फक्त राजकारण महत्त्वाचं आहे, हे गेल्या चार महिन्यांत सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळं राजकारणाशिवाय आपल्याला दुसरं काही बोलताच येत नसेल तर शांत बसलेलंच अधिक योग्य राहील."

हेही वाचा : राज्याचे 'हे' मंत्री करणार प्लाझा डोनेट.... 

पुणे :  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना  रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेले  प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे . महाराष्ट्र सरकारने केलेल्या विनंतीनुसार जे कोरोना रुग्ण होते त्यांनी प्लाझ्मा दान करावे, त्याला प्रतिसाद देणारे आव्हाड हे पहिले मंत्री ठरले आहेत. मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यातुन मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रूग्णालयात जाऊन प्लाझ्मा डोनेट करणार आहे, असे आव्हाड यांनी  ट्विट केले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी राज्यभर प्लाझ्मा थेरपीचा वापर होतो आहे. महाराष्ट्रात जगातील सर्वांत मोठी प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींनी अन्य रुग्णांवरील उपचारांसाठी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख