#WhatsApp डाउन झाल्याने मनस्ताप... - Trouble with WhatsApp shutting down | Politics Marathi News - Sarkarnama

#WhatsApp डाउन झाल्याने मनस्ताप...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जुलै 2020

भारतीय वेळेनुसार काल रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी व्हाटस्अॅप डाउन झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.

पुणे : जगातील सगळ्यात लोकप्रिय आणि सोशल मीडियावर युजर्स सर्वाधिक अॅक्टीव्ह राहतात ते  व्हाटस्अॅप काही काळ बंद पडल्याने नेटिझन्सला त्रास सहन करावा लागला.  भारतासह अनेक देशात असंख्य युजर्सला यामुळे फटका बसला. एका अहवालानुसार भारतीय वेळेनुसार काल रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी व्हाटस्अॅप डाउन झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. कारण जगातील असंख्य युजर्स आपले व्यवसाय आणि उद्योग व्हाटस्अॅपच्या माध्यमातून करीत असल्याचे त्यांना याचा मोठा फटका बसला.  सध्या  व्हाटस्अॅप व्यवस्थित सुरू आहे. 

अचानक व्हाटस्अॅप डाउन झाल्याने अनेक युजर्सने याबाबत फेसबुकवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.  पण याबाबत व्हाटसअॅपकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.  एकुण ७२ टक्के युजर्सला याचा फटका बसला असल्याचे समजते. भारत (नवी दिल्ली), श्रीलंका, पेरू, लंडन, न्यूयॅार्क,नेदरलॅंड, जर्मनी, कोलबिंया, स्वीडन, रोमानिया, कजकिस्तान, आयलॅंड आदी देशात  व्हाटस्अॅप डाउन झाले होते.   फेसबुक आणि इंस्टाग्राम काही काळ बंद पडल्याचा प्रकार यापूर्वी झाला आहे.  

एनक्रिप्टेट एप्लिकेशन मुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते. असाच प्रकार यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये दोनवेळा झाला होता. Whatsappचे जगात १५० कोटी पेक्षा जास्त युजर्स आहेत. Whatsapp हे  Android (एंड्रॉइड) आणि  iOS (आईओएस) या दोन्ही माध्यमावर उपलब्ध  आहे.   व्हाटस्अॅप हे फेसबुकच्या मालकीचे आहे. 
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा  : मराठा आरक्षणाचा फैसला २७ तारखेला... 

पुणे : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची आज होणारी अंतिम सुनावणीत तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.  ही सुनावणी आता ता. २७ जुलैला होणार आहे. पण वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती दिलेली नाही.  २७ तारखेला याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. याबाबत त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.  या याचिकेसोबत १० उपयाचिकांवरही सुनावणी होणार होती. समोरासमोर सुनावणी व्हावी, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी आहे. सुप्रीम कोर्टातली सुनावणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. सुप्रीम कोर्टात आज वैद्यकीय प्रवेशातल्या मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय होणार होता. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची शेवटची तारीख 30 जुलै 2020 आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या  सुनावणीचं महत्त्वं वाढले होते.  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लागू करू नये, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात आहे. महाराष्ट्र सरकारने हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली आहे. त्यांच्यासोबतच  कपिल सिब्बल यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख