#sushant singh:अंकिताची सुशांतविषयीची भावनिक पोस्ट व्हायरल... - #sushant singh: Ankita's emotional post about Sushant goes viral ... | Politics Marathi News - Sarkarnama

#sushant singh:अंकिताची सुशांतविषयीची भावनिक पोस्ट व्हायरल...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जुलै 2020

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हिने पहिल्यांदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत  यांच्या मृत्यूला आज महिना झाला आहे. सुशांतने १४ जून रोजी बांद्रा येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हिने पहिल्यांदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

अंकिता सुशांत याच्या निधनानंतर खूपच अस्वस्थ झाली होती. या दुःखातून बाहेर पडण्याच्या ती एक महिन्यापासून पर्यंत करीत आहे. अंकिता ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. पण गेल्या महिनापासून ती सोशल मीडियापासून अप्लित आहे. आज एक महिन्यानंतर तीने पहिल्यांदा इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.  सुशांतच्या मृत्यूनंतर ती पहिल्यांदा भावूक झाली आहे.  तिने शेअर केलेल्या फोटोखाली लिहिले आहे. "देवाचा मुलगा " या तिच्या पोस्टवर अनेक नेटिझन्सने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी (ता.14) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तो 34 वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच त्याच्या माजी व्यवस्थापिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला किस देश मे है मेरा दिल  ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या पवित्र रिश्ता या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. नंतर त्याने काय पो  या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 

त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. सुशांतचे काही चित्रपट हिट ठरले होते, पण त्यानंतरही त्यांच्या हातात मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट नव्हता.   छिछोरे  सारखा त्यांचा शेवटचा सिनेमा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तरीही या मुंबईच्या माया नगरीमधील अनेक मोठ्या बॅनर, निर्मात्यांनी त्यांच्यावर कळतनकळत बहिष्कार टाकला होता. सुशांत हा अभिनेता शाहरूख खान आणि अक्षयकुमार सारखा  या बॅालिवुडमध्ये  आऊटसाईडर  होता. बॅालिवुडमधील काही कळप त्याला चित्रपट मिळू नये म्हणून सारखे प्रयत्नशील असायचे, अशीच सध्या चर्चा आहे.

 Edited : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख