सुशांत म्हणतो, "आपण पहिल्यांदा मुलगी तर शोधा..."  - Sushant says, "If you find a girl for the first time ..." | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत म्हणतो, "आपण पहिल्यांदा मुलगी तर शोधा..." 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

सुशांतचा हा व्हिडिओ पाहून असे वाटते की पटना येथील त्यांच्या घरातील हा व्हिडिओ असावा. सुशांतच्या त्या व्हिडिओमध्ये ती महिला त्याला विचारतो, लग्नाला सहपरिवार बोलणार का ?

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत एका महिलेशी संवाद साधत आहे. त्यावर सुशांत याने मजेदार उत्तर दिले आहे. सुशांतचा हा व्हिडिओ पाहून असे वाटते की पटना येथील त्यांच्या घरातील हा व्हिडिओ असावा. सुशांतच्या त्या व्हिडिओमध्ये ती महिला त्याला विचारतो, लग्नाला सहपरिवार बोलणार का ?

यावर सुशांत म्हणतो, "आपण पहिल्यांदा मुलगी तर शोधा," त्यानंतर ती महिला त्याला विचारते, "गावाकडील मुलगी चालले का?", यावर अभिनेता सुशांत याने उत्तर दिले आहे की "का नाही..." सुशांत सिंह यांच्या या निरागस आणि सरळ स्वभावाचे दर्शन या व्हिडिओमधून आपल्याला होते. फेसबुकवर हा व्हिडिओ आतापर्यंत तीन लाखापेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे कैातुकही केले आहे. 
 
 
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी (ता.14) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तो 34 वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच त्याच्या माजी व्यवस्थापिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला 'किस देश मे है मेरा दिल' ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. नंतर त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 

त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. सुशांतचे काही चित्रपट हिट ठरले होते, पण त्यानंतरही त्यांच्या हातात मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट नव्हता.  'छिछोरे' सारखा त्यांचा शेवटचा सिनेमा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तरीही या मुंबईच्या माया नगरीमधील अनेक मोठ्या बॅनर, निर्मात्यांनी त्यांच्यावर कळतनकळत बहिष्कार टाकला होता. सुशांत हा अभिनेता शाहरूख खान आणि अक्षयकुमार सारखा  या बॅालिवुडमध्ये 'आऊटसाईडर' होता. बॅालिवुडमधील काही कळप त्याला चित्रपट मिळू नये म्हणून सारखे प्रयत्नशील असायचे, अशीच सध्या चर्चा आहे.

सुशांतसिंह राजपूत याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरोघात बिहारमधील न्यायालयात खटला दाखल झाला आहे. रिया हिने सुशांतची आर्थिक पिळवणूक करुन त्याचा मानसिक छळ केला, असा आरोप करण्यात आला आहे. 

 

रिया चक्रवर्ती हिची मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कसून चौकशी केली आहे. मात्र, अद्याप तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सुशांतशी भांडण झाल्याचेही तिने पोलिस चौकशीत कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता मुझफ्फरपूर येथील कुंदन कुमार याने मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 24 जूनला सुनावणी होणार आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख