शून्य भांडवलावरच राष्ट्रवादीत आमदारकी मिळते... - Only with zero capital can one get MLA status in NCP | Politics Marathi News - Sarkarnama

शून्य भांडवलावरच राष्ट्रवादीत आमदारकी मिळते...

मनोज भिवगडे   
गुरुवार, 18 जून 2020

कोण कुणाच्या गटाचा या भानगडीत न पडता साहेबांच्या विश्‍वासातील नेत्यांच्या मार्गदर्शनात मी अकोला जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करून दाखवेल, असा दृढ आत्मविश्‍वास आमदार अमोल मिटकरी यांनी  व्यक्त केला. 

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २१ वर्षांचा झाला आहे... हे तरूणाईचे वय...म्हणजे आमचा पक्ष तरूण झाला आहे...या पक्षातच तरूणांना संधी मिळू शकते...योग्य टाईम साधून पक्षासाठी काम केले तर शून्य भांडवालावर आमदारकी देणारा पक्ष राष्ट्रवादीच आहे, हा अनुभव माझ्या निमित्ताने तरूणांना आला असेल. साहेबांनी माझ्यावर पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आधी काय झाले, कोण कुणाच्या गटाचा या भानगडीत न पडता साहेबांच्या विश्‍वासातील नेत्यांच्या मार्गदर्शनात मी अकोला जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करून दाखवेल, असा दृढ आत्मविश्‍वास आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी  व्यक्त केला. 

जिल्ह्यातील प्रख्यात व्याख्याता अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची आमदारकी दिली. या निमित्ताने त्यांने त्यांच्याशी संवाद साधला असताना पक्षाचे व्‍हिजन असलेल्या शेती, शिक्षण, आरोग्य व उद्योग या क्षेत्राला केंद्रीत माणून काम करणार असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी काम करण्याची संधी आहे. मला मिळालेली आमदारकी ही मी संधी माणतो. आखलेल्या योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अकोला जिल्हा आधी राष्ट्रवादीमय होणे आवश्‍यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून प्रत्येक पातळीवर हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कसा होईल, याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. ते करीत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजीसोबतच भाजप व वंचित बहुजन आघाडी या विरोधी पक्षांचे आव्हानही असेल. दोन माजी आमदार आमच्या पक्षात आले. त्यामुळे आता मागे काय झाले त्याचा विचार न करता पुढे आमच्याच पक्षातील सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या मार्गदर्शनात पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले.
 
होय... मी अजितदादांचा निकवर्तीय !      

विधान परिषदेवर माझी उमेदवारी जाहीर झाली, त्यापूर्वीच पाच महिने आधी अजितदादांनी माझे नाव जाहीर केले होते. त्यामुळे अजितदादा असो व साहेब असो किंवा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील असो यांच्या निकवर्तीय आहेच. अकोला जिल्ह्यात जरी मी वंचित असलो तरी पक्ष श्रेष्ठींकडे टाकलेला शब्द खाली जात नाही. वरिष्ठ पातळीवर मी ‘पावर’फुल आहे. त्याचा फायदा अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी योजना राबविण्याकरिता निश्‍चितच करून घेईल, असे आमदार मिटकरी म्हणाले.  

 

हेही वाचा : शेतकऱ्यांचे नुकसान मोजणारी यंत्रणा अजून नाही... 

पुणे : "सगळ्यांचे नुकसान मोजता येईल, पण शेतकऱ्यांचे नुकसान मोजता येत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान मोजणारी यंत्रणा अजून निर्माण झालेली नाही," असे मत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले. खानापूर तालुक्यातील बलवडी येथील बलवडी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने आर्सेर्नीक अल्बम कोरोना प्रतिबंधसाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गोळयांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार बाबर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे,  माजी सरपंच मारुती पवार उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख