कोंबड्याची बाग अन् मंगलाष्टके ; वऱ्हाडींना फक्त चहा पाणी..  

सरकारचे नियम पाळून आणि अगदी कोणताही लग्न मुहूर्त न बघता कोंबड्याच्या बागेला लग्न विधी पार पडला.
Marriage.
Marriage.

यवतमाळ : लग्न म्हंटल की लग्न पत्रिका, जागरण, गोंधळ, बँड, डीजे, आप्तेष्ट, निमंत्रित मान्यवर, सखे सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी असा मोठा लवाजमा. लग्नाच्या दिवशी हा सर्व लवाजमा मंगलकार्यालयात नेला जातो. अन् थाटामाटात लग्न विधी पार पाडले जातात. पण या सर्व रितीरिवाजाला फाटा देत कोणतीही विवाहाची तिथी न बघता एक अनोखा विवाह नुकताच पाहावयास मिळाला. होय, यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील अमोल टेकाळे आणि माहूर तालुक्यातील नेहा चिचोंडे यांचे असेच अनोखे लग्न पार पडले.
          

कोरोनाच्या संचारबंदीच्या पाचव्या टप्यात लग्नविधी पार पाडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यांच्यावर मात करीत हा एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. सरकारचे नियम पाळून आणि अगदी कोणताही लग्न मुहूर्त न बघता कोंबड्याच्या बागेला लग्न विधी पार पडला. आणि सर्वात अनोखे म्हणजे लग्नाच्या शाही भोजनाऐवजी फक्त चहा- पाणी. विश्वास नाही न बसत. पण यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील अमोल टेकाळे आणि माहूर तालुक्यातील नेहा चिचोंडे यांच्या या विवाहाने नविन आदर्श घालून दिला आहे.  

अगदी मोजकेच वऱ्हाडी मंडळी, प्रथेनुसार हिरवा मांडव यांच्या समक्ष हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. टेकाडे कुटुंबातील अमोल आणि चिंचोडे परिवारातील नेहा या नवदाम्पत्याचा विवाह माहूर तालुक्यातील वडसा या गावी अगदी भल्या पहाटे कोंबडा बाग देतो, त्यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून विवाह झाला. यामुळे वधू पित्याच्या होणाऱ्या खर्चाला आला बसला आहे.


हेही वाचा : होय..! विवाह होणार केवळ 27 हजारांत 
 
नागपूर : वधूवराची स्वतंत्र व्यवस्था, मोजके पाहुणे, रुचकर जेवण आणि कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षेचे सर्व उपाय या चतुःसूत्रीवर भर देत आखीव रेखीव विवाह सोहळा कमीत कमी खर्चात आयोजित करण्याचा नवीन व्यावसायिक दृष्टिकोन सभागृह, लॉन मालकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वीकारला आहे. कोरोनाच्या आधी लाखांच्या घरात असलेला विवाहांवरील खर्च चक्क काही हजारांवर आला आहे.  

नागपूर शहरात दीड हजारांवर मंगल कार्यालये आहेत. तसेच छोटी-मोठी सभागृहे आणि लॉनदेखील पाचशेवर आहेत. ही सर्व ठिकाणे विवाहांसाठी वर्षभर "बुक' असतात. कार्यालयाचे कमीतकमी भाडे सरासरी 40 हजार रुपये असते. अधिक सुविधा असणाऱ्या कार्यालयांचे भाडे लाखांत असते. लॉन आणि सभागृहांचीही स्थिती जवळपास सारखीच आहे. भाड्याव्यतिरिक्त विद्युत शुल्क, सफाई (स्वच्छता) शुल्क, खुर्च्यांचे भाडे, कुलर, सजावटीचे शुल्क ऍडव्हान्स म्हणून घेतले जाते. कोरोनामुळे लॉकडाउन लागू होताच मंगल कार्यालये आणि लॉन मालकांचा अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला. अनेक विवाह रद्द झाल्यामुळे घेतलेला ऍडव्हान्स परत करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

लॉकडाउनच्या आधीच बहुतेक कार्यालयांचे बुकिंग झाले होते. मात्र, मागील दोन महिन्यांत अनेकांनी घरच्या घरीच विवाह सोहळा उरकला. जून महिन्यांतील विवाहांसाठी सभागृह आणि लॉन चालकांनी कोरोना बचावाच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थाही कमी खर्चात उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवत व्यवसाय वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com