'एमपीएससी'चे सुधारित वेळापत्रक जाहीर... - MPSC revised schedule announced | Politics Marathi News - Sarkarnama

'एमपीएससी'चे सुधारित वेळापत्रक जाहीर...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

११ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पुणे : सरकारनं पुढे ढकललेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आयोगाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ही परीक्षा पुढे ढकलली होती. मात्र, आता या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

एमपीएससीच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षांचे  नवे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.  तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. एमपीएससीचे सुधारीत वेळापत्रक आज जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ता.26 ऑगस्ट रोजी एमपीएससीच्या परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे टि्वट करून जाहीर केले होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.     

हेही वाचा : खासगी नोकरदारांना रेल्वेत प्रवेश देण्याची मागणी
मुंबादेवी : मुंबई अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात असली तरी मुंबईची जीवनवाहिनी लोकलमध्ये केवळ सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश आहे. लाखो खासगी नोकरदारांसमोर बेस्ट बस व खाजगी वाहनांचाच पर्याय आहे. यातही कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रवासहाल सोसतच नोकरी करावी लागत असल्याचे चित्र संपुर्ण मुंबईत दिसून येत आहे. चर्चगेट,सीएसएमटी, ऑपेरा हाऊस, ग्रांटरोड, कुलाबा,मलबार हिल, मुंबादेवी, मशिद बंदर, सैंड्‌हर्स्ट रोड, गिरगाव, पंडित पलुस्कर चौक येथे सायंकाळी घरी जाण्यासाठी चाकरमाण्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. काही ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होते तर, काही ठिकाणी तुंबळ गर्दी होते. कर्मचारी कित्येक तास केवळ बसची वाट पाहत असतात. अशाच रांगा ऑपेरा हाऊस, रॉक्‍सी सिनेमा येथील पंडित पलुस्कर चौक येथे लागलेल्या पाहुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्यांसाठीही मुंबई लोकल रेल्वे सेवा तात्काळ सुरु करा, अशा घोषणा येथे दिल्या. तसेच, या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख