राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा - mpsc put cap on attempts of examination from 2021 | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 डिसेंबर 2020

अनेक तरुण वयाच्या चाळीशीपर्यंत परीक्षा देतात....

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीनुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. त्यानुसार आता खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी सहा आणि राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी कमाल नऊ परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा राहणार नाही. जानेवारी 2021 पासून या परीक्षांची संख्या मोजली जाईल.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी लाखो तरुण प्रयत्न करत असतात. वयाच्या पस्तीशी,चाळीशी उलटली तरी अनेक विद्यार्थी हा मार्ग सोडत नाही. त्यामुळे त्यांची उमेदीची वर्षे वाया जातात. परिणामी परीक्षांना बसण्याच्या संख्येवर नियंत्रण देण्याची मागणी त होती. आता राज्य लोकसेवा आयोगाने यादृष्टीने पाऊल टाकले आहे. त्यानुसार आजच आदेश देण्यात जारी करण्यात आला.

या आदेशानुसार पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास उमेदवाराची ती एक संधी समजली जाईल. पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थिती राहिली तरी ती एक संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची ती परीक्षेची संधी समजली जाईल. 

आमदार नारायण कुचे यांच्या सालगडी निवडणुकीपासून वंचित

औरंगाबादः ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू नकोतुला निवडणूक लढवायची असेल तर माझे पैसे आधी देकाम सोड अन मग उभा राहायंअशी धमकी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी आपल्या सालगड्याला दिली होतीया धमकीचा आणि सालगड्याच्या मेव्हण्याशी कुचे यांचा झालेला संवाद याचा आॅडिओ चांगलाच चर्चेत आला होताअखेर सालगड्याने मेव्हण्याचा आग्रह झिडकारत कुचे यांच्याकडेच काम करण्याचा निर्णय घेत माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहेग्रामपंचाय निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होतापरंतु सालगड्याने अर्जच दाखल केला नसल्याचे समोर आले आहे.

बदनापूर तालुक्यातील बावने पांगरी गावातील ग्रामपंयात निवडणुकीत आपल्या भावजीने उमेदवारी अर्ज भरावाअशी मेव्हण्याची इच्छा होतीमतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप आमदार नारायण कुचे यांना याची कुणकुण लागलीतेव्हा त्यांनी सालगड्याला धमकावलेखबरदा निवडणुकीला उभा राहशील तरउभचं रहायचं असलं तर आधी माझ्याकडून घेतलेले पैसेदे माझे काम सोड अन् मग खुशाल उभा राहाअसा दम कुचे यांनी सालगड्याला भरला होता.

तिकडे दाजीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा तयारीत असलेल्या मेव्हण्याला जेव्हा हे कळाले तेव्हात्याने थेट आमदार कुचे यांनाच फोन लावत माझ्या भावजीला धमक्या का देताआमच्या गावांत हस्तक्षेप का करतातुम्हाल मतं मागायला पुन्हा आमच्या गावात यायचे नाही काअसा सवाल करत जाब विचारला होतायावर कुचे यांनी देखील मी का तुझ्या भरवशावर निवडूण येतो कातुझ्या भावजीला निवडणूक लढवायची असलं तर आधी माझे पैसे देकाम सोड आणि मग उभा रहायंमी बघून घेतोअशा शब्दांत आव्हान दिले होते.

दरम्यानकुचे आणि मेव्हण्यामध्ये झालेल्या संवादाची आॅडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होतीत्यामुळे सालगडी आमदार कुचेंचा आदेश मानतो का मग मेहुण्याचा मान राखत निवडणुकीला उभा राहतोयाची उत्सूकता जिल्ह्यात होतीआज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदुत संपली तेव्हा सालगड्याने आपल्या मालकाचा आदेश शिरसावंद मानत मेहुण्याचा आग्रह मोडल्याचे स्पष्ट झालेनिवडणुकीला उभे राहून पराभूत झालो तर हातचे काम देखील जाईलअसा व्यवहार्य विचार करत अखेर सालगड्याने नमते घेतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख