#FeedFood4SSR ; सुशांतच्या स्मरणार्थ अन्नदान मोहीम.. - # FeedFood4SSR; Food donation drive in memory of Sushant | Politics Marathi News - Sarkarnama

#FeedFood4SSR ; सुशांतच्या स्मरणार्थ अन्नदान मोहीम..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

श्वेता सिंह कीर्तीने आता सुशांतच्या स्मरणात गरीब व बेघर नागरिकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची  (Sushant Singh Rajput) बहिण श्वेता सिंह कीर्ती (Shweta Singh Kirti)हि आपल्या भावाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. ती नेहमीचं सुशांतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करीत असते. सुशांतला न्याय मिळावा, म्हणून टि्वटरवरून ती नेहमी मोहीम राबवित असते. 

श्वेता सिंह कीर्तीने आता सुशांतच्या स्मरणात गरीब व बेघर नागरिकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत श्वेता मोहीम राबवित आहे.या मोहीमेबाबत श्वेताने पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "चला गरीब आणि बेघर नागरिकांना अऩ्नदान करू या." या मोहीमेत अनेक नेटकरी सामील झाले आहेत. मोहीमेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.  सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी श्वेताने यापूर्वी मोहीम राबविली होती. त्या मोहीमेत शंभर देशातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. 
 

कंगनाचं चित्रीकरण झालेल्या विमान कंपनीवर कारवाईचा बडगा..?
 नवी दिल्ली : चंडीगड-मुंबई या विमान प्रवासादरम्यान अभिनेत्री कंगना राणावतची अदा टिपण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी चित्रीकरणासाठी गोंधळ घातला. याप्रकरणी मुलकी विमान वाहतूक नियमन महानिर्देशालयाने (डीजीसीए) विमान कंपनीकडून स्पष्टीकरणं मागविले आहे. विमानात चित्रीकरण करू दिले तर संबंधित विमान कंपनीला आता ते महागात जाणार आहे. विमान प्रवास नियमावलीनुसार संबंधित कंपनीच्या विमान उड्डाणांवर पुढचे दोन आठवडे बंदी घातली जाईल, असा कडक इशारा मुलकी विमान वाहतूक नियमन महानिर्देशालयाने (डीजीसीए) दिला आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या अलीकडच्या चंडीगड-मुंबई या विमान प्रवासादरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन होते. त्यांनी विमानात घातलेला गोंधळ व कोरोना काळातील सामाजिक अंतरभानाच्या नियमाचे तीनतेरा वाजविल्याच्या पार्श्‍वभूमीवर विमान वाहतूक मंत्रालयाने हा बडगा उगारला आहे

रिया चक्रवर्तीचा कारागृहातील मुक्काम वाढला...
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनच्या आरोपावरून अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा जामीन अर्ज न्यायालयानं  फेटाळला. त्यामुळे तिचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या चौकशीनंतर एनसीबीने रियाला अटक केली होती. रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. मंगळवारी न्यायालयाने रियाची जामिनाची मागणी फेटाळून तिला 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी दिली होती. जामीन न मिळाल्यानंतर सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की एनडीपीएसच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाने जाण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख