dhawalsinh mohite patil
dhawalsinh mohite patil

त्या बिबट्याला मारण्यासाठी अकलूजच्या धवलसिंह मोहिते पाटलांची नेमबाजी कामी आल्याची चर्चा

मोहिते पाटलांचा नेम लागल्याची चर्चा

करमाळा : करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर अकलूज येथील धवलसिंह मोहिते पाटील यांनी बंदूकीच्या गोळया घालून ठार मारल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आली.

नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पशूटरची नियुक्ति केली होती. परंतु त्यांनाही गुंगारा देत बिबट्याचा वावर सुरूच होता. त्यानंतर अकलूज येथील नेमबाजीत तरबेज असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाने परवानगी दिली होती. त्यानुसार धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी नरभक्षक बिबट्याचा खात्मा केला आहे.

तीन जणांचे जीव घेणाऱ्या करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्यात आज सायंकाळी यश आले. गेले पंधरा दिवस तो वनसंरक्षक दलाला हुलकावणी देत होता. त्याला मारण्यासाठी हेलिकाॅप्टरही देण्याची आॅफर राजकीय नेत्यांनी केली होती.  अखेर आज सायंकाळी सा़डेसहाच्या सुमारास करमाळयातील वांगी नंबर 4 या गावात शार्प शूटरने गोळया घालून बिबट्याला ठार मारले.

नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पसूटरची नियुक्ती केली होती. त्यांना अखेर यश आल्याने येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निः श्वास सोडला.

या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाच्या शार्प शूटरनी फायरिंग करूनही नेम चुकल्याने बिटरगाव येथून पुन्हा एकदा बिबट्या निसटला होता. यापूर्वी चिखलठाण परिसरातील उसात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पाच एकर ऊस पेटवून देण्यात आला होता. तसेच, चारही बाजूंनी शार्प शूटर तैनात करुनही बिबट्या वन अधिकाऱ्यांसमोरून पळाला होता. आता नेम चुकल्याने तो पुन्हा निसटला. त्यामुळे शार्पशूटर पाचारण करूनही बिबट्या एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा सुटतोच कसा? असा प्रश्न संपूर्ण तालुक्याला पडला होता.

नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश मिळूनही बिबट्याला शार्पशूटरचा नेम का लागत नाही? याविषयी तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.

यापूर्वी चिखलठाण येथे ७ डिसेंबर रोजी बिबट्याला मारण्यसाठी ऊस पेटवून देण्यात आला होता. त्या उसाच्या चारही बाजूंनी शार्पशूटर लावण्यात आले होते, तरीही वन अधिकाऱ्यांसमोरून बिबट्या पळाला होता. त्यानंतर सांगवी नं. २ येथे गुरुवारी (ता. १० डिसेंबर) मनीषा पाटील या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्या कशाबशा बचावल्या. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने नगर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील १२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात करमाळा तालुक्यात ६ दिवसांत ३ बळी घेतले.

करमाळा तालुक्यात वन विभागाचे २०० कर्मचारी तैनात असताना गेली 15 दिवसांपासून वन विभागाला बिबट्या जेरबंद करता आला नव्हता. वनविभागाची यंत्रणा ड्रोन, वाघर, डाॅग पथक यांच्या मदतीने त्याचा शोध घेत होती.प्रशासकीय पातळीवरून २१ पिंजरे, ३ ड्रोन कॅमेरे, ४२ ट्रप कॅमेरे, ५ शार्पशूटर, बेशुद्ध करणारी २ पथके, १ डाॅग स्वाॅड आणि वन विभागाची १६ पथके, राज्य राखीव दलाची एक तुकडी आणि ग्रामस्थ बिबट्याच्या शोधासाठी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com