उपजिल्हाधिकारी झालेल्या हरीश सूळ यांनी स्वतःमधील उणिवा शोधल्या आणि मात केली! - deputy collector harish sul success story | Politics Marathi News - Sarkarnama

उपजिल्हाधिकारी झालेल्या हरीश सूळ यांनी स्वतःमधील उणिवा शोधल्या आणि मात केली!

संपत मोरे
शनिवार, 20 जून 2020

सूळ सांगतात,"अपयशाने मी खचून गेलो नाही. स्वतःतील उणिवा शोधल्या, त्यावर मात केली. मागील चुका दुरुस्त केल्या.
राज्यात 22 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो."

पुणे : "जेव्हा माझा निकाल जाहीर झाला तेव्हा मी रानात होतो. उसाची पाचट काढत होतो. मित्राचा फोन आला, 'रिझल्ट लागलाय चेक कर. मी चेक केलं तर मी 22 वा क्रमांक मिळवला होता. तसाच गावात आलो, आईला सांगितलं आई, मी उपजिल्हाधिकारी झालो. आईचे डोळे आनंदाश्रुनी भरून आले..." महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या हरीश सूळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोरोची या माळशिरस तालुक्यातील एका छोट्या गावातील हरीश सूळ यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केले आहे. त्यांच्याशी 'सरकारनामा'ने संवाद साधला. सूळ यांचे इयत्ता १ ली ते १० पर्यंतचे शिक्षण मोरोची गावात झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांनी ११ वी १२ वीचे शिक्षण पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयात पूर्ण केले. नंतर त्यांनी बी ई मेकॅनिकलचे शिक्षण पिंपरी येथील डी वाय पाटील महाविद्यालयात पूर्ण केले.  अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर त्यांना एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली पण चांगल्या पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्याची आवड असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. २०१३ ला तयारी चालु केली. राज्यसेवेच्या पाच मुख्य परीक्षा वेळा दिल्या. तीन मुलाखती दिल्या. दरवेळी
यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

सूळ सांगतात,"अपयशाने मी खचून गेलो नाही. स्वतःतील उणिवा शोधल्या, त्यावर मात केली. मागील चुका दुरुस्त केल्या.
राज्यात 22 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो." मिळालेल्या यशाबद्दल बोलताना सूळ म्हणाले,"मला व्यायामाची, वाचनाची आवड आहे. कमी काळ पण जास्त गुणवत्तापुर्ण अभ्यास करण्यावर भर दिला. प्रश्नाचे योग्य विश्लेषण केले. दररोज ८-१० तास न चुकता अभ्यास केला."

चंद्रकांत गुडेवार सांगलीत रूजू 
सांगली : "कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, ही माझी ओरिजनल प्रायोरिटी आहे', असे सांगत चंद्रकांत गुडेवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून प्रभारी पदभार सोपवावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार काल रात्री चर्चा झाली. श्री. राऊत यांनी श्री. गुडेवार यांच्याकडे पदभार सोपवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर लागलीच ते जळगावसाठी रवाना झाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख