विद्यार्थ्यांच्या हिताचाच 'हा' निर्णय होणार... - The decision will be in the interest of the students .. | Politics Marathi News - Sarkarnama

विद्यार्थ्यांच्या हिताचाच 'हा' निर्णय होणार...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 जून 2020

राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी : राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत राज्यपाल यांनी लिहिेलेल्या पत्राबाबत विद्यार्थ्यांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. 

"एकदंरीत विद्यार्थ्यांची परिस्थिती बघता ते संभ्रमात आहेत, राज्यपालांनी लिहिलेले पत्रामुळेही संभ्रम निर्माण झाला आहे. मी कोकणात असल्यामुळे कार्यालयात जाऊ शकत नाही. लवकरत मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तो हिताचाच निर्णय विद्यार्थ्यांसाठी असला पाहिजे, ही भूमिका राज्य सरकारची आहे, मी देखील याच भूमिकेवर ठाम आहे. अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परिक्षांबाबत जे विद्यार्थ्यांच्या मनात आहे, तोच निर्णय होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही.  तसेच घाबरण्याचे कारण नाही," असे सावंत यांनी म्हटले आहे.  

उदय सामंत म्हणाले, "गेले आठ ते दहा दिवस परीक्षांसंदर्भात मी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांशी संवाद साधू शकलो नाही. कोकणामध्ये जे निसर्ग वादळ आले. त्यामध्ये कोकणकिनारपट्टीला फार मोठे नुकसान झाले. त्या लोकांची पाहणी करीत आहे. त्या लोकांना आम्ही मदत करीत आहेत. त्यांना नुकसानभरपाई देणे सुरू आहे." 

 

हेही वाचा : बीडचे कलेक्टर , एसपीही सेल्फ क्वारंटाईन...

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कुटूंबातील व्यक्तींसह इतरांचे स्वॅब निगेटीव्ह आले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उद॒घाटन व लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.  लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, डॉक्टरांसह जिल्हाधिकारी राहूल रेखावार देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख