मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान  कोरोना पॅाझिटिव्ह ... - Chief Minister Shivraj Singh Chaihan Corona Positive  | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान  कोरोना पॅाझिटिव्ह ...

वृत्तसंस्था
शनिवार, 25 जुलै 2020

माझा कोरोना अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, किंवा क्वारटाइन व्हावे. 

भोपाळ :  मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान हे कोरोना पॅाझिटिव्ह झाले आहेत. याबाबत त्यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे. आपल्या टि्वटमध्ये शिवराज सिंह चैाहान म्हणतात की माझ्या प्रिय प्रदेशवासियांनो, मला कोवीड १९ चे लक्षण जाणवत होते. त्यासाठी मी कोरोनाची तपासणी केली. माझा कोरोना अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, किंवा क्वारटाइन व्हावे. 

आपला कोरोनाचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्यावर शिवराज सिंह चैाहान यांनी सांगितले, "मी सध्या कोरोनाच्या सर्व उपाययोजना करीत आहेत. डॅाक्टरांच्या सल्लानुसार उपचार घेत आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की छोटीशी चुकही तुमच्या जीवावर संकट म्हणून येऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मला भेटत होते. त्यावेळी मी कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. पण, कोरोनाच्या समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना मदत करणे हे माझे कर्तव्य होते. माझ्या संपर्कातील सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. 

"कोरोनाला घाबरून नका. वेळेवर उपचार घ्या. मी २५ मार्चपासून दररोज सांयकाळी कोरोनाबाबत बैठक घेत होतो. आता ही बैठक व्हिडोओ  कांफ्रेंसिंगच्या माध्यमातून होईल. माझ्या गैरहजरीमध्ये गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, मंत्री भूपेंद्र सिंह,  विश्वास सारंग , डॉ. प्रभु राम चौधरी हे बैठक घेतील. मी क्वारंटाइन काळात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्व प्रयत्न करत राहिल. आपण सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करीत कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करा. "भाजपचे मीडिया प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान यांच्या कोरोनाच्या उपचाराबाबत सांगितले ते सामान्य व्यक्तीप्रमाणे चिरायु रूग्णालयात उपचार करीत आहेत. त्यांना विशेष सुविधांची गरज नाही. 

 

हेही वाचा  : ठाकरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांची अशीही पोटदुखी असेलही....." 

पुणे : विरोधी पक्षनेते हे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील कोरोनाची अपडेटस् देत असावेत... मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असा टोला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. याबाबतची सविस्तर मुलाखत सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत 'सामना'चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख