एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर  - Announced revised schedule of MPSC exams | Politics Marathi News - Sarkarnama

एमपीएससी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  या परीक्षांबाबत आता सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. 

पुणे : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एप्रिल, मे मध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकल्यात आल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  या परीक्षांबाबत आता सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. 

सुधारीत वेळापत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब - संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 11 अॅाक्टोबर 2020 रोजी होणार आहे. तर 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षाबाबत एमपीएससीने आज परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. 

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारने यंदा नोकरभरती होणार नाही, असे जाहीर केले होते. या परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. एमपीएससीने आज वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून परीक्षा घेण्याचे आवाहान एमपीएससीपुढे आहे. कोरोनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

 

हेही वाचा : मुंबईत विविध देशातून 82 विमाने आली, आणखी ७६ येणार!

मुंबई :  वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानातुन तब्बल १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ७६ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. आलेल्या एकूण १३ हजार ४५६ प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४९८९ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ४३६४ आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ४१०३ इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार कॉरंटाईन करण्यात येत आहे.  मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख