गल्वान खोऱ्यातील शहीदांचे बलिदान रूपेरी पडद्यावर.... - Ajay Devgn will now make a film on the Indo-China conflict | Politics Marathi News - Sarkarnama

गल्वान खोऱ्यातील शहीदांचे बलिदान रूपेरी पडद्यावर....

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

चित्रपटात चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांच्या बलिदानाची कहानी दाखविण्यात येणार आहे. चित्रपटसमिक्षक तरण आदर्श यांनी याबाबत एक टि्वट करून ही माहिती दिली आहे.

पुणे : गल्वान खोऱ्यात झालेल्या भारत- चीन संघर्षावर निर्माता व अभिनेता अजय देवगन आता चित्रपट बनविणार आहे. या चित्रपटात चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांच्या बलिदानाची कहानी दाखविण्यात येणार आहे. चित्रपटसमिक्षक तरण आदर्श यांनी याबाबत एक टि्वट करून ही माहिती दिली आहे. चित्रपटातील कलाकार आणि त्याचे नाव निश्चित झालेले नाही. चित्रपटातील कोण भूमिका करणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. अजय देवगन यात भूमिका करणार की नाही, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.   

 

तरण आदर्श यांनी आपल्या टि्वटमध्ये आहे की भारत-चीनचा गलवान येथील सीमावाद या विषयावर अभिनेता अजय देवगन चित्रपट बनविणार आहे. 15 जून रोजी चीनच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात भारतीय वीस जवान शहीद झाले होते. त्यांची बलिदानाची ही कहानी असणार आहे. अजय देवगन याच्या एफफिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिग एलएलपी प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचे समजते. अजय देवगनची 'भुजः द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट येणार असून या चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, एम्मी विर्क, प्रणिता सुभाष, शरद केळकर आदींसह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. अभिषेक दुधैया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा त्यांनीच लिहिली आहे. अजय देवगन याचा शेवटचा तान्हाजी हा सिनेमा आला आहे.
  
1975 नंतर पहिल्यांदा भारत-चीन सैनिकांमध्ये वाद हल्ला झाला आहे. 1975 मध्ये चीनच्या सैन्याने अरूणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्याच्या छावणीवर हल्ला केला होता. भारत आणि चीनमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मागील महिन्यापासून चर्चा सुरू आहे. मात्र, 15 जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. यात चीनचेही काही सैनिक ठार झाल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. मात्र, नेमकी संख्या लष्कराने जाहीर केलेली नाही. चीनच्या सैन्यानेही त्यांच्या ठार झालेल्या जवानांचा आकडा सांगितलेला नाही. 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात चीनचे सुमारे 35 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख