माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाशी ठरलेलं लग्न अभिनेत्रीने मोडले... - Mehreen Pirzada decides call of engagement to congress leader politician bhavya bishnoi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाशी ठरलेलं लग्न अभिनेत्रीने मोडले...

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जुलै 2021

हरियाणाताली तालेवार घराण्याचील नातू... 

मुंबई : अभिनेत आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या बातमीची बाॅलीवूडमध्ये चर्चा सुरू असताना दुसऱ्या एका अभिनेत्रीने एका राजकारण्यासोबतच आपलं नियोजित लग्न मोडल्याची घोषणा केली आहे. हा राजकारणी देखील हरियाणामधील तालेवार घराण्यातील आहे. हरियाणाचे अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या भजनलाल यांचा नातू भाव्या बिष्णोईसोबत या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला होता. मात्र हे लग्न मोडल्याचे तिने आज जाहीर केले. तेलगू चित्रपटांत काम केलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे मेहरीन पिरझादा. ती F2: Fun and Frustration या चित्रपटाने चर्चेत आली होती. (Mehreen Pirzada had lavish engagement ceremony with Bhavya Bishnoi.) 

या दोघांचा जयपूर येथील महालात मार्च 2021 मध्ये झालेला `एंगेजमेंट सेरिमनी`गाजला होता. त्यातील अनेक फोटोही सोशल मिडियात चर्चिले जात होते. त्यानंतर हे जोडप लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा होती. मात्र हे लग्न होणार नसल्याची घोषणा मेहरीनने केल्याने अनेकांनी आश्चर्य़ व्यक्त केेले. हा निर्णय घेणे जड गेले पण तो खासगी निर्णय आहे, त्याचा तुम्ही आदर कराल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. यापुढे तिचा भाव्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी कोणताही संबंध नसेल.  मी यापुढे काम करत राहणार असून माझ्या पुढील कामासाठी आणि चित्रपटांसाठी तुमच्या शुभेच्छा राहू द्या, असे आवाहन तिने केले आहे. 

भाव्या हा काॅंग्रेसचा नेता म्हणून हरियाणात काम करतो आहे. त्याने 2019 च्या निवडणुकीत काॅंग्रेसकडून हिस्सार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. मात्र त्याचा पराभव झाला. त्याचे वडिल कुलदिप बिष्णोई हे पण खासदार होते. मेहरीनच्या निर्णयानंतर अद्याप बिष्णोई कुटुंबाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचे आजोबा भजनलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री तसेच केंद्रात मंत्री होते. राजकारणात गाजत असलेल्या `आयाराम-गयाराम` संस्कृतीचा पायंडा त्यांनी पाडला होता.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख