आदित्य ठाकरे यांनी रात्री दीड वाजता मैत्रीणीच्या मेसेजला रिप्लाय दिला.... - aditya thackrey gives reply to his friend after midnight | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे यांनी रात्री दीड वाजता मैत्रीणीच्या मेसेजला रिप्लाय दिला....

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 14 जून 2020

आदित्य ठाकरे ट्विटवरवर रात्री उशिरापर्यंत असतात. अनेकदा नागरिकांच्या आलेल्या तक्रारींवर ते संबंधित यंत्रणेला कळवत असतात. पण वाढदिवसाच्या दिवशी त्यांना विशेष मेसेज आला आणि त्यांनीही त्यास रिप्लाय दिला. 

पुणे : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटनी आणि पर्यावरणमंत्री यांच्यातील मैत्रीची चर्चा सर्वत्र सुरू असते. विशेष म्हणजे या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 13 जून रोजी असतो. दिशाने काल आदित्य यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या. इन्स्टास्टोरीवरून आदित्य यांच्यासोबतचे छायाचित्र दिशाने शेअर केले आहे. आदित्य यांनी शनिवारची रात्र उलटल्यानंतर रात्री दीड वाजता दिशाच्या मेसेजला रिप्लाय दिला. 

“Happiest b’day @AUThackeray stay the amazing you and keep shining,” अशा शब्दांत ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या. हे ट्विट 26 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले होते. आदित्य यांना शुभेच्छा देताना दिशालाही त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . या ट्विटला खास रिप्लाय आदित्या यांनी रात्री दीड वाजता दिला. Thank you so much Disha! One of those few people who I can say “same to you” on 13th of June for a birthday wish! Keep shining and rising असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही आदित्य यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर तुमचे आशिर्वाद असेच कायम राहू द्या, अशी भावना आदित्य यांनी व्यक्त केली. 

दिशा आणि आदित्य यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. आदित्य दिशाला सोबत घेऊन गाडी चालवत असल्याचेही छायाचित्रांतून दिसत होते. दिशा हिने मैत्री असलेल्या तरुणांसोबत जेवायला जाण्यास काय हरकत आहे, असे यावर एका मुलाखतीत सांगितले होते. तिचा टायगर श्राॅफसोबतचा फोटो दिसल्यानंतर त्यावरूनही ती ट्रोल झाली होती. 

अवधूत गुप्ते यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या मुलाखतीत आदित्य यांची यावरून फिरकी घेतली होती. वडिलांच्या पसंतीची करणार की आईच्या पसंतीची, असा प्रश्न अवधूत यांना विचारला होता. मला अजून काम करायचे आहे, असे उत्तर आदित्य यांनी त्यावर दिले होते. या उत्तराला प्रत्युत्तर देताना आप कुछ बी बोलो.. आप का उत्तर हमें पटनी चाहिये. आप की बात हमें पटनी चाहिये, असे सांगत सांगत हास्याचा स्फोट घडवून आणला होता. त्यावर आदित्य यांनी तुमची `दिशा` चुकली आहे, असे चलाखीने सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख