कुस्तीपटू डीवायएसपी राहुल आवारेंनी लग्नाच्या मेंदीतूनही ऑलिंपिक फिव्हर जपला - Wrestler DYSP Rahul Aware also got Olympic fever from his wedding meal | Politics Marathi News - Sarkarnama

कुस्तीपटू डीवायएसपी राहुल आवारेंनी लग्नाच्या मेंदीतूनही ऑलिंपिक फिव्हर जपला

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

त्यांनी आपले हे प्रेम लग्नात हातावर काढलेल्या मेंदीतूनही दाखवून दिलं आहे

पुणे : डीवायएसपी अर्जुन पुरस्कार विजेते पहिलवान राहुल आवारे यांचा रविवारी पुण्यात अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या पवारसोबत विवाह झाला . 

राहूल आवारे हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू आहेत. त्यांनी आपले हे प्रेम लग्नात हातावर काढलेल्या मेंदीतूनही दाखवून दिलं आहे. त्यांनी आपल्या मेहेंदीत ऑलिंपिकची पाच वर्तुळं काढत, रेसलिंग इज माय लाईफ, असे लिहिवून लग्नानंतरही ऑलिंपिकचे स्वप्न कायम असून त्यासाठी तयारी करणार असल्याचे सांगितले आहे.  

प्रियांकाशी लग्न करुन राहुल आवारे हे त्याचे गुरु भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू काकासाहेब पवार यांचे जावई झाले आहेत. काका पवारांनी भारताला 31 पदके जिंकून दिली आहेत. राहुलनेही राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या फ्री-स्टाईल कुस्तीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

या लग्न सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राम शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक ते अर्जुन पुरस्कार विजेते राहुल यांनी कुस्तीमध्ये जोरदार मुसंडी मारीत 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

त्यानंतर 2019 ला कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही कांस्य पदक मिळविले. त्यापाठोपाठ आशियायाई स्पर्धेमध्ये दोन कांस्य आणि एक रौप्य पदक त्यांनी पटकाविले. आवारे यांच्या या कामागिरीची दखल केंद्र सरकारने घेतली. त्यांना यावर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. राज्य सरकारकडून 'डिवायएसपी'ची संधी मिळाली आहे.  

बीडमधील पाटोद्याजवळील पथारी या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात राहुल आवारे यांचा जन्म झाला. वडील बाळासाहेब आवारे हेही राज्यपातळीवरील कुस्तीपटू, शेतकरी. पण घरची परिस्थती तशी बेताचीच. अशा परिस्थतीतही वयाच्या सातव्या वर्षापासून वडिलांनी राहुल आणि त्यांचा भाऊ गोकुळला कुस्तीचे धडे देण्यास सुरूवात केली. मात्र व्यावसायिक कुस्तीला शहाराशिवाय पर्याय नाही, हे ओळखून त्यांच्या वडिलांनी राहुल यांना कुस्ती खेळण्यासाठी पुण्याला पाठविले.

2004 पासून ते भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालमीमध्ये 'रुस्तम-ए-हिंद' हरिश्‍चंद्र बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवू लागले. त्यांच्या निधनानंतर 2012 पासून पहिलवान काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कात्रज-आंबेगाव येथील तालमीमध्ये त्यांनी कुस्ती खेळण्यास सुरूवात केली. 

ऑलिंपिकची तयारी सुरुच ठेवणार 

राहूल अवारे यांचे सासरे कुस्तीपटू काकासाहेब पवार यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले की, राहूल यांचे ऑलिंपिकमध्ये देशासाठी गोल्ड मेडेल जिंकण्याचे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते लग्नानंतर देखील सराव चालू ठेवणार आहेत. माला खात्री आहे. की ते देशासाठी नक्कीच गोल्ड मेडेल जिंकतील. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख