....तो पर्यंत नोकरभरती नको : संभाजी ब्रिगेडची मागणी - Sambhaji Brigade requests government to stop Mega Employment drive | Politics Marathi News - Sarkarnama

....तो पर्यंत नोकरभरती नको : संभाजी ब्रिगेडची मागणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे या समाजातील मुलांसमोर मोठा प्रश्न उभारला आहे, त्यामुळे जोपर्यँत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही नोकरभरती सरकारने करू नये अशी मागणी  संभाजी ब्रिगेडने केली आहे.

पुणे  : मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे या समाजातील मुलांसमोर मोठा प्रश्न उभारला आहे, त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही नोकरभरती सरकारने करू नये अशी मागणी  संभाजी ब्रिगेडने केली आहे.

समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, या बाबत सरकारला जाग यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालसमोर नुकतेच मशाल आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, विराज तावरे, चंद्रकांत घाडगे, अविनाश मोहिते, मंदार बहिरट, प्राची दुधाने यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

मराठा समाजाचा इतर मागास (ओबीसी) प्रवर्गात समावेश करावा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढलेला अध्यादेश तात्काळ रद्द करावा. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नव्याने होणाऱ्या सर्व प्रवेश प्रक्रियेत शुल्कात ५० टक्‍के सवलत द्यावी. त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पोलिस भरतीसह कुठलीही मेगा भरती प्रक्रिया घेऊ नये. 'सारथी' ला तात्काळ वाढीव आर्थिक मदत द्यावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मराठा समाजातील मुलांनी एसईबीसी अंतर्गत अर्ज केले आहेत. त्याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख