Breaking - एमपीएससीची परिक्षा २१ मार्चला होणार

शासनाने काल रद्द केलेली राज्य सेवा पूर्व परिक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या उद्रेकानंतर आता शासनाने या परिक्षेची पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या २१ मार्चला ही परिक्षा होणार असून १४ मार्चच्या परिक्षेसाठी दिलेल्या हाॅल तिकिटावरच विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे.
MPSC Exams will be held on 21st April
MPSC Exams will be held on 21st April

पुणे: शासनाने काल रद्द केलेली राज्य सेवा पूर्व परिक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या उद्रेकानंतर आता शासनाने या परिक्षेची पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या २१ मार्चला ही परिक्षा होणार असून १४ मार्चच्या परिक्षेसाठी दिलेल्या हाॅल तिकिटावरच विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे. 

२७ मार्च रोजी होणारी राज्य अभियांत्रिकी पूर्व परिक्षा व १९ एप्रील रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट पूर्व परिक्षा व संयुक्त पूर्व परिक्षा २०२० यांच्या तारखांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे शासनाने कळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. कोरोनामुळे ही परीक्षा आतापर्यंत तब्बल सहावेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.  या निर्णयानंतर विरोधाचा पहिला भडका पुण्यात उडाला. त्यानंतर निषेधाचे लोण संपूर्ण राज्यभर पसरले. 

दरम्यान, सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार व नेतेही आता विद्यार्थ्यांच्या बाजून उभे राहिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घातले होते. कोविडच्या नियमांचे पालन करून ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परीक्षेच्या मुद्यावर लक्ष घालण्याची विनंती केली होती. यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून पुढे जावे लागेल. त्यानुसार ही परीक्षा झाली पाहिजे, असे ट्विट पवार यांनी केले होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com