स्टेजवर बोलावत हर्षवर्धन पाटलांनी दिले भरणेंच्या मुलाला आशीर्वाद! 

माजी मंत्री पाटील यांनीही श्रीराजला स्टेजवर बोलावून घेतले.
Harshvardhan Patil gave blessings to Dattatreya Bharane's son!
Harshvardhan Patil gave blessings to Dattatreya Bharane's son!

पुणे : इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. तालुक्‍यात या दोघांमध्ये शह-कटशहाचे राजकारण कायम रंगलेले असते. पण, याही परिस्थितीत प्रथा-परंपरा, प्रेमाचा ओलावा जपण्याचे काम या नेतेमंडळींकडून होत असते. इंदापूर शहरातील एका लग्न समारंभात कट्टर विरोधक भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांना स्टेजवर बोलावून घेत त्यांच्यासोबत फोटो काढत हर्षवर्धन पाटील यांनी हेच दाखवून दिले आहे. 

दरम्यान, स्टेजवर पोचताच श्रीराज भरणे यांनीही चरणस्पर्श करत हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत आदर व्यक्त केला. पाटील यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. कायम एकमेकांच्या विरोधात तुटून पडणारे भरणे-पाटील यांच्यातील या घटनेचे तालुक्‍यात मात्र कुतुहल आहे. 

इंदापुरातील सुनील हेंद्रे यांची कन्या कोमल हेंद्रे हिचा विवाह शहरात पार पडला. वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे कार्यकर्त्यांसह विवाह सोहळ्याला उपस्थित होते. विवाह सोहळा झाल्यानंतर वधू-वर यांच्यासमवेत फोटोसेशन सुरू झाले होते. 

माजी मंत्री पाटील हे नव वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेले. पाटील हे फोटोसेशनला आल्यानंतर नजीकच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे उपस्थित होते. त्या वेळी लग्न सोहळ्यातील मान्यवरांनी श्रीराज यांनाही फोटो काढण्यासाठी स्टेजवर बोलाविले. 

खरंतर राजकीय पार्श्वभूमी पाहता हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रेय भरणे यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. तरीही श्रीराज भरणे यांचे आगमन होताच माजी मंत्री पाटील यांनीही श्रीराजला स्टेजवर बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर श्रीराज भरणे हेही हर्षवर्धन पाटील यांच्या पाया पडले. त्यानंतर पाटील यांनीही श्रीराज भरणे यांना आशीर्वाद दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com