अवघ्या वीस मिनिटांत सोडविला अजितदादांनी प्रश्‍न  - Ajit Pawar helped maharashtra students to come back home | Politics Marathi News - Sarkarnama

अवघ्या वीस मिनिटांत सोडविला अजितदादांनी प्रश्‍न 

संपत मोरे 
सोमवार, 11 मे 2020

तामिळनाडू येथे महाराष्ट्रातील 170 युवक अडकले होते. या युवकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून मदत मागितली आणि दादांनी अवघ्या वीस मिनिटांत त्यांचा प्रश्न सोडविला

पुणे : तामिळनाडू येथे महाराष्ट्रातील 170 युवक अडकले होते. या युवकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून मदत मागितली आणि दादांनी अवघ्या वीस मिनिटांत त्यांचा प्रश्न सोडविला.

या युवकांना संपर्क करून सालेममध्ये एकत्र आणले. रविवारी दुपारी एकच्या सुमारास तिथे सांगलीतून गाड्या येणार होत्या. येणाऱ्या चार गाड्याचे पास तयार होते, मात्र एका गाडीचा पास तयार नव्हता. त्यामुळे रविवारी सायंकाळपासून गाड्या थांबून होत्या. तामिळनाडू येथील प्रशासन महाराष्ट्रातील प्रशासनाकडे बोट दाखवत होते. सातारा येथील हिराकांत जाधव या युवकाने उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संपर्क साधला. दादांनी फोन केल्यामुळे अवघ्या वीस मिनिटांत पास मिळाला आणि 170 युवकांचा महाराष्ट्रात येण्याचा मार्ग मोकळा झाला. 

"एका गाडीचा पास नव्हता; म्हणून आम्ही बसून होतो. पण दादांमुळे पास मिळाला,' असे या युवकांनी सांगितले. या गाडीतील युवक सातारा, जळगाव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नाशिक असे वेगवेगळ्या जिल्ह्यांतील मुले आहेत. काही शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तसेच काही रेल्वेमध्ये ट्रेनिंगसाठी आहेत. या मुलांना आता आपापल्या घरी जाता येणार आहे. 

"आम्ही रविवारी सकाळी तामिळनाडूच्या वेबसाईटवर प्रयत्न केले; पण आम्हाला अजून सहा तास प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र अजित पवार यांना फोन केल्यावर त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांच्यामुळे वीस मिनिटांत आम्हाला पास मिळाला,'' असे हिराकांत जाधव म्हणाले. 
"अजितदादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल ऐकून होतो; पण आज आम्हाला परराज्यातही त्यांची मदत झाली,'' असे जाधव म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख