आडसुरेगावच्या सरपंचपदाची माळ २३ वर्षाच्या युवतीच्या गळ्यात! - Twenty Three Year Lady became Sarpanch of Village in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

आडसुरेगावच्या सरपंचपदाची माळ २३ वर्षाच्या युवतीच्या गळ्यात!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

आडसुरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रथमच सर्वात तरुण वयाच्या २३ व्या वर्षी उच्च शिक्षित आशा रामकृष्ण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.तर युवानेते प्रकाश कोकाटे यांच्या पत्नी साविता कोकाटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.

येवला  : आडसुरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रथमच सर्वात तरुण वयाच्या २३ व्या वर्षी उच्च शिक्षित आशा रामकृष्ण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.तर युवानेते प्रकाश कोकाटे यांच्या पत्नी साविता कोकाटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.काम करण्याची आवड असली की वयाचा अडथळा ठरत नाही हे सरपंच निवड झालेल्या आशाताई यांनी दाखवले आहे.

विशेष म्हणजे त्या एम.एस्सी पदवीधर असून त्यांच्या उच्चशिक्षनाचा लाभ नक्कीच गावाच्या विकासाला होणार आहे.एवढ्या कमी वयात सरपंचपदी निवड होण्याचा हा पहिलाच प्रकार असून यामुळे कु.चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आडसुरेगाव येथे गेल्या ५० वर्षामध्ये पहिल्यांदाच सर्व ७ जागासह ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती.त्यामध्ये प्रकाश कोकाटे व भास्कर चव्हाण यांच्या पॅनलला ७ पैकी ५ जागा मिळाल्याने बहुमताने एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.

सरपंच निवडीच्या सभेत दोन्ही पदासाठी विहित वेळेत एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिवनेये,ग्रामसेवक आर.एन.ठोंबरे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून आनंद साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य दिलीप चव्हाण,जानकाबाई थोरात व नानासाहेब गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी युवानेते प्रकाश कोकाटे,भास्कर चव्हाण, माजी सरपंच गोरखनाथ कोकाटे,
सुंदरनाथ कोकाटे,विलास चव्हाण, सोपान गायकवाड,विकास चव्हाण, कारभारी गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.

याप्रसंगी साहेबराव चव्हाण,श्रावण चव्हाण,रामदास चव्हाण,शांताराम चव्हाण,सुनील चव्हाण,गोकुळ चव्हाण, किशोर चव्हाण,पंडीत चव्‍हाण, बाळासाहेब चव्हाण,विलास चव्हाण, योगेश चव्हाण,कैलास चव्‍हाण,दत्तात्रय चव्हाण,मच्छिंद्र चव्हाण,बद्रीनाथ चव्हाण,बाबुराव चव्हाण,जालिंदर चव्हाण,संजय चव्हाण,राजाराम थोरात, लहानु सुरासे,अण्णा सुरासे,रंजक चव्हाण,पोपट चव्हाण,जगन चव्हाण, रावसाहेब चव्हाण,बबन कोकाटे,दत्तू कोकाटे,किशोर कोकाटे,टकचंद कोकाटे, भानुदास हिवाळे,नवनाथ बिडवे, बाबासाहेब चव्हाण,बापू कोकाटे,भास्कर चव्हाण,दत्तू चव्हाण,विश्वनाथ सोमासे, संजय औताडे,राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

अल्प वयात सरपंचपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,त्याचे मी नक्कीच सोने करेल. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा  विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून विकासाबरोबरच गावच्या सर्वसामान्याच्या समस्या सोडविन - आशा रामकृष्ण चव्हाण,सरपंच, आडसुरेगाव

Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख