मनालीमध्ये अडकलेल्या युवकांची समीर भुजबळांमुळे झाली सुटका - Samir Bhujbal Helped Nashik Youth stranded in Manali to Come Back | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मनालीमध्ये अडकलेल्या युवकांची समीर भुजबळांमुळे झाली सुटका

संपत देवगिरे
सोमवार, 4 मे 2020

नाशिकचे दोन युवक कुल्लु-मनालीला (हिमाचल प्रदेश) लॉकडाऊन झाल्याने ते अडकले होते. माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या युवकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क करुन त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्याने आज त्यांची सुटका झाली. 

नाशिक : येथील तीन युवक कुलू-मनालीला (हिमाचल प्रदेश) व्यवसायिक कामासाठी गेले होते. मात्र लॉकडाऊन झाल्याने ते अडकले होते. माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या युवकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क करुन त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्याने आज त्यांची सुटका झाली.

नाशिकचे अक्षय भालेराव, संजय बावीस्कर हे दोगे व्यवसायिक कामनिमित्त मार्च महिन्यात मनालीला गेले होते. २५ मार्चला त्यांनी परतण्याचे आरक्षण केले होते. मात्र, २३ मार्चला देशात लॉकडाऊन झाला. त्यामुळे ते मनालीत अडकले. लॉकडाऊन झाल्याने त्यांना परतण्याचा मार्ग खुंटला. त्यांनी तेथून निघण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. 

स्थानिक तहसीलदारांनी दिले रेशन

या दोन्ही युवकांनी  स्थानिक तहसीलदार कार्यालयाशी संपर्क केल्यावर त्यांना रेशन देऊन तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. महिनाभर थांबल्यावर त्यांनी नाशिकला परतण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप खैरे यांच्याशी संपर्क केला. श्री. खैरे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना ही माहिती दिल्यावर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर प्रशासकीय स्तरावरुन मनालीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर कुलू जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या युवकांना नाशिकला परतण्यासाठी पास तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्याची पूर्तता झाल्यावर त्यांना वाहन उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे आज सकाळी वाहन चालक रुद्र गुप्ता यांसह हे दोघे युवक नाशिककडे रवाना झाले. 'कोरोना' संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती, संचारबंदी व लॉकडाऊन यामुळे गेले सहा आठवडे मनालीत अडकलेल्या युवकांना नाशिकचा मार्ग खुला झाला आहे.

भुजबळांचे मानले आभार

या युवकांच्या सुटकेसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे यश आले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने कुलु-मनाली येथे अडकून पडलेले पंचवटीतीली दोन्ही युवकांना नाशिकला जाण्याची परवानगी दिली आहे. ''सहा आठवडे मनालीत अडकून पडल्याने आमची मोठी गैरसोय झाली होती. स्थानिक प्रशासनाकडून अजिबात दाद दिली जात नव्हती. त्यामुळे समीर भुजबळ यांच्याशी संपर्क केल्यानंतर आम्हाला नाशिकला परतणे शक्‍य झाले. त्यासाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो,'' असे अक्षय भालेराव यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख