ग्रामीण भागातील मुले प्रशासनात उजवीच ठरतात : विश्वास नांगरे पाटील

ग्रामीण भागातील मुले प्रशासनात काम करता करता समाजाविषयीचा जिव्हाळा जपतात. त्यातून ते प्रशासनाला देखील एका उंचीवर नेतात. त्यामुळे ते उजवे ठरतात, असे मत नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले
Rural Youth Always Ahead in Administration Claims VIshwas Nangre Patil
Rural Youth Always Ahead in Administration Claims VIshwas Nangre Patil

नाशिक : ''ग्रामीण भागातील मुले प्रशासनात काम करता करता समाजाविषयीचा जिव्हाळा जपतात. त्यातून ते प्रशासनाला देखील एका उंचीवर नेतात. त्यामुळे ते उजवे ठरतात. भरत आंधळे याच संस्कृतीतील असल्याने नक्कीच प्रभावी ठरतील,'' असे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगीतले. 

नाशिकचे सुपुत्र असलेले आणि सध्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हीसमध्ये कार्यरत असलेले भरत आंधळे यांच्या "गावकुसातील जितराबं' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी "ईडी'चे सह आयुक्त उज्ज्वल कुमार चौहान, अंकुर काळे उपस्थित होते. 

''महाराष्ट्रातील ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेल्या युवकांना स्पर्धा परिक्षा, प्रशासन सेवा याकडे आकर्षणवाढत आहे. त्यासाठी विविध साधने, सुविधा उपलब्ध होत आहेत.. यावेळी त्यांनी ग्रामीण संस्कृती आणि त्यातील युवकांमधील प्रशासन सेवेकडील आकर्षण वाढत आहे. हे समाधानकारक आहे,'' असे नांगरे पाटील म्हणाले.

एक हजाराहून अधिक व्याख्याने

ते पुढे म्हणाले, ''मी आजवर एक हजारापेक्षा अधिक व्याख्याने ग्रामीण विद्यार्थी, युवकांसाठी दिली आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवेचा मार्ग स्विकारला. त्यातील यशस्वी लोक भेटतात, तेव्हा आनंद होतो. भरत आंधळे हे देखील असेच ग्रामीण मातीशी नाळ जुळलेले आहेत. त्यामुळे ते प्रशासकीय काम करता करता आपण समाजाचे काही देणे लागतो याची देखील जाणीव ठेवतात. त्यातून निश्‍चितच समाजोपयोगी भरीव काम करण्यास चालना मिळते. लोकांची कामे करता येतात,''

''श्री. आंधळे यांच्या 'गांवकुसातील जितराब' या पुस्तकात त्यांनी ग्रामीण संस्कृति एक वेगळी प्रेरणा देऊन जाते. ठाणगाव (सिन्नर) येथील ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेले आंधळे यांनी केवळ 'आयआरएस' सेवेत निवड झाल्यावर तेव्हढ्यावरच न थांबता, आपल्या गावातील जुन्या संदर्भ, माहिती व तत्कालीन वातावरणातील विषयांना उजाळा देण्याचे काम पुस्तकातून केले. त्यातून युवकांना नवी दिशा देण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,'' असे गौरवोद्गार नांगरे पाटीय यांनी काढले.  

''शाळेतूनच मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. त्याचे वास्तव चित्रण या पुस्तकात केले आहे. त्यातूनच निश्‍चय करून मी शाळेत जात राहिलो. माझा विचार कधी सोडला नाही. दहावीनंतर मी गावाच्या बाहेर पडलो. पुढे शिकलो, 'युपीएससी' परीक्षा पास झालो. कदाचित शिक्षकांनी मला आयुष्य बदलणारे मागर्दर्शन घडविले नसते, तर आज मी शेतात कुठतरी जनावरांच्या मागे उभा असतो. आज माझ्या आयुष्यात असे एकही वर्ष येत नाही, की मला शिक्षकांची आठवण होत नाही. त्यांनी दाखवलेल्या गणपतीच्या एका देखाव्याने माझं आयुष्य कायमच बदलून गेल होत. पण माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला सर आज या जगात नाहीत. ही सल माझ्या मनात कायमची राहून गेली आहे,'' असे आंधळे यांी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com