जितेंद्र आव्हाडांचे समर्थक म्हणतात...आमच्या गावात कोरोनाला प्रवेश नाही - Jitendra Avhad followers distribute mask in the vlllage | Politics Marathi News - Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांचे समर्थक म्हणतात...आमच्या गावात कोरोनाला प्रवेश नाही

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

जितेंद्र आव्हाड यांचे मुळ गाव असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील पाट पिंपरी येथे त्यांच्या समर्थकांनी गावात घरोघर जाऊन कोरोना विषयी जनजागृती केली. प्रत्येकाला मास्क वाटले. यावेळी ते म्हणाले, "आम्ही जागरुक आहोत. आमच्या गावात कोरोनाला प्रवेश नाही.' 

नाशिक : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला. या मध्ये त्यांच्या कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे समर्थक अधिक जोमाने कामाला लागले. आव्हाड यांचे मुळ गाव असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील पाट पिंपरी येथे त्यांच्या समर्थकांनी गावात घरोघर जाऊन कोरोना विषयी जनजागृती केली. प्रत्येकाला मास्क वाटले. यावेळी ते म्हणाले, "आम्ही जागरुक आहोत. आमच्या गावात कोरोनाला प्रवेश नाही.' 

श्री. आव्हाड यांचा समर्थक असलेल्या अमोल हिंगे या युवकाने पाट पिंप्री येथे सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप केले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, संघटक रविंद्र काकड, तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, सुनिल लहामगे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे परिसरातील विविध गावांत हा उपक्रम राबविण्याचा आता त्यांचा मानस आहे. 

" ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीशी इमान राखणे हे आपले काम आहे. येथील संस्कृती जतन करणे, जातीवाद संपवून बंधुभाव कसा निर्माण होईल हे आम्ही श्री. आव्हाड यांच्या संपर्कात आल्यानंतर आत्मसात केले. त्यामुळे जेव्हा आव्हाड यांना कोरोना झाला तेव्हा अनेकांना खुप वाईट वाटले. कोरोनाच्या या लढाईत आव्हाड यांच्या कार्यक्रमांवर बंधने आली. मात्र आमचा संपर्क कमी झालेला नाही. त्यामुळे त्यांनी कोरोनाला पराभूत केल्याने आम्ही आमच्या गावात कोरोनाला येऊच देणार नाही ही प्रेरणा घेतली आहे,'' असे या युवकांनी सांगीतले. 

''सामाजिक बांधिलकी हे श्री. आव्हाड यांचे ब्रीद आहे. या विचारातूनच आम्ही गावात व परिसरात अनेक उपक्रम केले आहेत. त्याचा प्रत्यय आज सिन्नर तालुक्‍यातील पाट पिंपरी या गावात आला. श्री. आव्हाड कोरोना बाधित झाल्यावर ते लवकर बरे होतील याची काळजी होती. ते बरे झाल्यावर आपल्या गावची खबरदारी म्हणून स्वखर्चाने सबंध गावात सॅनीटायझर आणि मास्क वाटप केले. गावात प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनीटायझर वाटप केले. कोणीही वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. या उपक्रमाने गावातील संरपच भानूदास ऊगले यांच्यासह त्यासाठी कोरोना विषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रम झाला,'' अशीही माहिती या तरुणांनी दिली

वाल्मिक शिंदे, नवनाथ वांळूज, सोमनाथ ऊगले, सोपान ऊगले, मधुकर नाठे, प्रकाश ऊगले, गणेश ऊगले, दत्तात्रय ताकाटे, सावळीराम ऊगले, रणजीत ऊगले, आण्णा शिंदे, धनंजय ऊगले, विकास हरणे, रावसाहेब ऊगले, शैला एरंडे, कमल उगले या उपक्रमात सहभागी झाले होते.
... 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख