अजितदादा म्हणतात, `रवींद्र पाटील हा युवक उद्याचे प्रेरणादायी नेतृत्व`
Pawar- Patil

अजितदादा म्हणतात, `रवींद्र पाटील हा युवक उद्याचे प्रेरणादायी नेतृत्व`

रवींद्र पाटील यांनी परिसराच्या विकासासाठी विविध कामे मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतली. हा तरुण कार्यकर्ता आणि उद्याचे नेतृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार म्हणाले.

भुसावळ : अडचणी असल्या तरी विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, (sufficient Funds will be avail for devolopment) अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच रवींद्र पाटील यांनी परिसराच्या विकासासाठी विविध कामे मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतली. हा तरुण कार्यकर्ता आणि उद्याचे नेतृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार म्हणाले. 

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विकासाची ही प्रक्रिया जळगाव जिल्ह्यात अखंडपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न हेच नाथाभाऊ यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

तालुक्यातील साकेगाव-कंडारी जिल्हा परिषद गटाचे सदस्य रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या दहा कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन विकासकामांचे उद्‍घाटन केले, तर ऑफलाइन सोहळा मोरया मंगल कार्यालयात झाला. 

मिटकरींनी केली भाजपवर टीका 
आमदार मिटकरी यांनी रवींद्र पाटील सक्रिय नेतृत्व असल्याचे सांगितले. तसेच भाजप पक्षावर व राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर त्यांनी निशाणा साधला. त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. आमदार नीलेश लंके म्हणाले, की आपण जेव्हा समाजासाठी काम करतो तेव्हा समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. रवींद्रचे कामसुद्धा असेच आहे असे सांगत कोविडकाळात कोरोना रुग्णांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली.  

भूमिपूजन सोहळ्याच्या व्यासपीठावर आमदार अमोल मिटकरी, पारनेरचे आमदार नीलेश लंके, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक ऑनलाइन सहभागी झाले. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या माध्यमातून आतापर्यंत जनसामान्यांशी जोडलेली नाळ याबाबत सांगून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विकासकामांची गंगा अखंडितपणे अशीच सुरू राहील, असे आश्वासन दिले.

या वेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, रमेश नागराज पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे, सभापती सचिन चौधरी, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना चौधरी, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, देवा वाणी, पुरुषोत्तम नारखेडे, किरण कोलते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे आदी उपस्थित होते. 

...

हेही वाचा...

Related Stories

No stories found.