दिलासादायक : पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सोय झाली ; आज पहिली बस जाणार  - First Bus Carrying MPSC Students will Leave from Swargate Today | Politics Marathi News - Sarkarnama

दिलासादायक : पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सोय झाली ; आज पहिली बस जाणार 

उमेश घोंगडे 
गुरुवार, 7 मे 2020

पुण्यात सुमारे अडीच हजार विदयार्थी आहेत. राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च  देखील सरकार करणार असल्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे

पुणे : एसटीच्या मदतीने राज्यातल्या विविध जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केलेल्या घोषणानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. 

पुण्यात सुमारे अडीच हजार विदयार्थी आहेत. राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च  देखील सरकार करणार असल्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 10 हजार एसटी बसेसने राज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलले. 

या प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. स्वारगेट स्टँड वरून बस निघणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याचे 'एमपीएससी स्टुडंट राईट्स' चे समनव्यक महेश बडे यांनी सांगितले.

देण्यात आलेल्या माहितीनुसार दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित विद्यार्थ्यांना त्याबाबत आधी कळवण्यात आले आहे. त्यामुळे इतरांनी कारणाशिवाय गर्दी करु नये असे आवाहन महेश बडे यांनी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख