गुरू महाराष्ट्रात राज्यपाल तर; शिष्य उत्तराखंडात मुख्यमंत्री! - Pushkar Singh Dhami will be new CM Of Uttarakhand | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

गुरू महाराष्ट्रात राज्यपाल तर; शिष्य उत्तराखंडात मुख्यमंत्री!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

युवा नेतृत्वाला दिली भाजपने पसंती

डेहराडून : उत्तराखंडमधील राजकीय घडामोडींनंतर अखेर पुष्करसिंह धामी यांना शनिवारी नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्याने सर्वांची नजर राज्याच्या नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे होती. भाजप विधिमंडळ गटाने बैठक घेऊन पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. (Pushkar Singh Dhami New CM Of Uttarakhand)

मुख्यमंत्रिपदासाठी तीन-चार नावे सातत्याने चर्चेत राहिली, पण सर्व अंदाज खोटे ठरवत भाजप पक्षश्रेष्ठी व आमदारांनी पुष्करसिंह धामींची निवड केली. खाटिमा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार असलेल्या धामी हे राज्यातील तरुण चेहरा आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी जवळचे मानले जातात. धामी हे उत्तराखंडमधील भाजपच्या युवा मोर्चाचे 2002 ते 2008 पर्यंत अध्यक्ष होते. धामी यांना तीन बहिणीही आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते. धामींचा जन्म पिथौरागडच्या तुंडी या गावी झाला. मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात त्यांनी पीजी आणि एलएलबी शिक्षण पूर्ण केले आहे.

वाचा या बातम्या : लातूरमधील त्या कारखान्यांची चौकशी होणार

राष्ट्रवादीने ती चूक वीस वर्षांनी दुरूस्त केली... 

माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाशी ठरलेले लग्न अभिनेत्रीने मोडले.. 

फडणविसांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी अचानक पेटली... 

पुष्करसिंह धामी म्हणाले चॅलेंज स्वीकारले...

पुष्करसिंह धामी यांनी उत्तराखंडच्या खाटिमा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविला. ते 2012 ते 2017 पर्यंत आमदार होते आणि त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. ते संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांचे समर्थक मानले जातात आणि महत्त्वाचे म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे पुष्करसिंह धामी हे विशेष कार्यकारी अधिकारी होते. अनेक नावे या पदासाठी चर्चेत होती. अखेर धामींची निवड झाली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख