शेतकरी आंदोलनासह क्रिकेटच्या मैदानातही तुपकर अव्वल

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचीराजकीय व्यासपीठावरील फटकेबाजी आणि फिरकी परिचित असतानाच नुकतीच चिखलीतील अमडापूर येथे प्रत्यक्ष मैदानावरील फटकेबाजी आणि फिरकी पाहण्याचा, अनुभवण्याचा योग अनेकांना आला.
Ravikant Tupkar Played Cricket
Ravikant Tupkar Played Cricket

बुलडाणा : 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळ आणि आंदोलनातील अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले नांव. राज्यभरात रविकांत तुपकरांचे भाषण, आक्रमकता आणि भाषणातील फटकेबाजी अनेकांनी अनुभवली आहे. त्यांच्या भाषणातील फटकेबाजी आणि कोणत्या क्षणी कोणाची विकेट घेईल, याचा नेम नसलेली फिरकी बऱ्याचजणांना गोत्यात आणणारी ठरली आहे. 

राजकीय व्यासपीठावरील ही फटकेबाजी आणि फिरकी परिचित असतानाच नुकतीच चिखलीतील अमडापूर येथे प्रत्यक्ष मैदानावरील फटकेबाजी आणि फिरकी पाहण्याचा, अनुभवण्याचा योग अनेकांना आला.
 
झाले असे की, रविकांत तुपकर चिखली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अमडापूर येथे युवकांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेला भेट देण्याची विनंती केली. तसाही क्रिकेट हा रविकांत तुपकरांचा आवडता खेळ. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. बॅटींग आणि बॉलिंगचाही सराव केला. 

त्यामुळे युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी तुपकर युवकांच्या आग्रहाखातर मैदानावर पोहचले. नुसतेच मैदानावर न जाता त्यांनी हातात बॅट घेऊन फटकेबाजीही केली. त्यानंतर त्यांनी बॉलींगसाठी बॉल हाती घेतला. कधीकधी भल्याभल्यांना चकवणारी फिरकी ते टाकतात तर कधी कुणाची क्षणार्धात विकेट घेण्यासाठी फास्ट यॉर्करही टाकतात. अमडापूर येथील मैदानातही त्यांनी अशीच बॉलींग करुन उपस्थितांना धक्का दिला. २०१४ मध्ये ते चिखली विधानसभेतून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले होते. परंतु त्यावेळी 'स्वाभिमानी'ला ही जागा मिळाली नाही. तर २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांची संधी हुकली. 

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या भांडणात त्यांना वस्त्रोद्योग महामंळाच्या पदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता ते येणाऱ्या काळात कोणत्या मतदारसंघात कोणती गुगली टाकून नेमकी कुणाची विकेट घेतात आणि कोठुन विजयी षटकार मारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या या राजकीय खेळीकडे राज्यभरातील जाणकारांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या आणि हो विरोधकांच्याही नजरा खिळल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com