मंगळवेढ्यातून पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणुक लढवावी : अमरजित पाटील - Amarjit Patil wants Parth Pawar to Contest election from Mangalwedha | Politics Marathi News - Sarkarnama

मंगळवेढ्यातून पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणुक लढवावी : अमरजित पाटील

भारत नागणे
रविवार, 27 डिसेंबर 2020

मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवरुन पार्थ पवार यांनी पोटनिवडणुक लढवावी, अशी मागणी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे

पंढरपूर : मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवरुन पार्थ पवार यांनी पोटनिवडणुक लढवावी, अशी मागणी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे

यासंदर्भात पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघ हा आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा परंपरागत मतदार संघ आहे.माझे आजोबा कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचे व आदरणीय शरद पवार साहेब यांचे स्नेहाचे संबंध सर्वांना परिचित आहेत. सन १९९० साली आदरणीय पवार साहेबांच्या एका शब्दावर कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांनी विधानसभेला आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सुधाकर परिचारकांना निवडून आणले होते. या पार्श्वभुमीवर आम्ही पवार साहेबांच्या घराण्याप्रती आमची निष्ठा कायम ठेवून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची मागणी आदरणीय पवार साहेबांकडे करित आहोत. तसे पत्र आम्ही आदरणीय पवार साहेबांना दिलेले आहे,''

"मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा पाणी प्रश्न असेल अथवा पंढरपूर प्राधिकरणाला गती देऊन सर्व कामे दर्जेदार होण्याचा प्रश्न असेल किंवा पंढरपूर शहर तालुक्यातील एम आय डी सी चा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न भविष्यात तिव्र होणार आहेत.या सर्व प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार यांनीच खरे तर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची गरज आहे. परंतु आदरणीय दादा हे सध्या बारामती मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत व उपमुख्यमंत्री आहेत. या पार्श्वभुमीवर पवार साहेबांच्या घरातीलच व्यक्तीने सदर मतदार संघाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे.आणि ते पार्थ पवार यांनी करावे अशी आमची मागणी आहे,'' असेही त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, ''पार्थ पवार हे उच्च शिक्षीत आहेत आणि त्यांच्यामुळे आदरणीय पवार साहेबांचे आणि अजितदादांचे सदर मतदार संघाकडे आपसुकच लक्ष राहील व येथिल प्रश्नांची सोडवणुक तातडीने होईल. दुसरीकडे पंढरपूरातील परिचारक गटाकडून आमदार असणारे प्रशांत परिचारक यांची विधानपरिषदेची मुद्दत अजून दीड वर्ष शिल्लक असल्यामुळे, पार्थ पवार यांची उमेदवारी दिल्यास पोटनिवडणुकी बाबत परिचारक गटाकडून उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता नाही.त्यामुळे पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकतर्फी विजयी मिळवून सदर मतदार संघ पक्षाकडे कायम राखणे सोपे जाईल,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख