युवासेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी - Yuva Sena Removed Three office Bearers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

युवासेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 जानेवारी 2021

पक्षाविरोधात काम केल्यामुळे गोवळमधील शिवसेनेसह युवासेनेच्या विद्यमान तीन पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पदासह पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर आणि देवाचेगोठणेचे विभागप्रमुख नरेश शेलार यांनी दिली. 

राजापूर : पक्षाविरोधात काम केल्यामुळे गोवळमधील शिवसेनेसह युवासेनेच्या विद्यमान तीन पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पदासह पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर आणि देवाचेगोठणेचे विभागप्रमुख नरेश शेलार यांनी दिली. 

रवींद्र कदम, प्रशांत गुरव व अभिजित कांबळे अशी त्या तीन पदाधिकाऱ्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले .गोवळ ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू असून त्यामध्ये शिवसेनेसह युवासेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात काम करताना गावविकास आघाडीला मदत केल्याचा आरोप तीन पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

यामध्ये रवींद्र कदम शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक विभागाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सेनेविरोधात गाव पॅनेलमध्ये सहभाग घेतला होता. प्रशांत गुरव हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांना गोवळ प्रभाग तीनमधून उमेदवारी दिली जाणार होती; मात्र त्यांनी ती नाकरली व व गावपॅनेलमध्ये सहभागी झाले. 

अभिजित कांबळे हेदेखील युवासेनेचे पदाधिकारी असून त्यांनीही पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या तिन्ही पदाधिकाऱ्यांची पदे व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर व देवाचेगोठणेचे शिवसेनेचे विभागप्रमुख नरेश शेलार यांनी माहिती दिली. आता ते पदासह शिवसेनेत राहिलेले नसल्याने त्यांचा शिवसेनेशी संबंध राहिलेला नाही, असे विभागप्रमुख शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

या करण्यात आलेल्या कारवाईची पत्रे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके व तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांना पाठविण्यात आली असल्याची माहिती सेनेचे उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर व विभागप्रमुख नरेश शेलार यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स