युवक काँग्रेस सुरु करणार 'सोशल मिडिया चॅम्पियन टीम' - Youth Congress to Start Social Media Champions Team | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

युवक काँग्रेस सुरु करणार 'सोशल मिडिया चॅम्पियन टीम'

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 एप्रिल 2021

आगामी काळात पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सोशल मीडिया चॅम्पियन्स प्रभावीपणे करतील, असेही या वेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सोशल मीडिया प्रमुख समन्वयक ब्रीज दत्त यांनी सांगितले.

मुंबई  : भाजपच्या आयटी सेलशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने Youth Congress ‘सोशल मीडिया चॅम्पियन टीम’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपतर्फे सोशल मीडियावर सुरू असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या, इतिहास खोडून काढण्यासाठी, तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ही टीम स्थापन केल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे Satyajeet Tambe यांनी सांगितले. Youth Congress to Start Social Media Champions Team

‘सोशल मीडिया Social Media चॅम्पियन’ टीमसाठी कार्यकर्त्यांच्या नोंदणी मोहिमेची घोषणाही त्यांनी आज केली. धार्मिक ध्रुवीकरण आणि भाजपचा BJP प्रोपोगंडा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम सोशल मीडिया चॅम्पियन्स हाणून पाडतील. तसेच केंद्र सरकारच्या सामान्यांविरोधी धोरणांविरोधात आवाज उचलतील. तसेच लोकशाही तत्त्वांना बळकटी देण्याचे काम करतील, असा विश्वास सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. 

आगामी काळात पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सोशल मीडिया चॅम्पियन्स प्रभावीपणे करतील, असेही या वेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सोशल मीडिया प्रमुख समन्वयक ब्रीज दत्त यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख