Satyajit Tambe questions about Maha Jobs scheme | Sarkarnama

महाजाॅब्स योजनेचे श्रेय काॅंग्रेसला का नाही? : सत्यजित तांबे राष्ट्रवादी व शिवसेनेवर नाराज

मुरलीधर कराळे
गुरुवार, 16 जुलै 2020

महाजाॅब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? असा सवाल सत्यजित तांबे यांनी विचारला आहे

नगर : सरकारने महा जाॅब्स ही योजना सुरू केली आहे. त्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे नियोजन आहे. याबाबत एक जाहिरात प्रसिद्ध झाली. तीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काही नेत्यांचे फोटो आहेत. त्यावरून युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करून ही योजना नेमका सरकारची की ठरावीक पक्षाची, असे ट्विट करून नवा वाद वाढवून घेतला आहे.

तांबे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे, की 'महाजाॅब्स' ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.``

काॅंग्रेसला सरकारमध्ये डावलले जात असल्याचा आरोप त्या पक्षाचे नेते नेहमीच करतात. आता तांबे यांच्या या आरोपावरूनही वाद ओढवण्याची शक्यता आहे. ही योजना तरुणांना थेट रोजगार देण्यासाठी आखण्यात आली आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्याचे श्रेय काॅंग्रेसला मिळत नसल्याची खंत त्या पक्षाच्या नेत्यांना आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख