रोहित पवारांनी वाढदिवसानिमित्त सोडला 'हा' संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा उद्या (ता. २९ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांच्या पत्नीचाही उद्याच वाढदिवस आहे. या निमित्ताने रोहित पवार यांनी एक संकल्प आपल्या फेसबूक पेजवर व्हिडिओ शेअर जाहीर केला आहे
Rohit Pawar to Take education expenses of 100 Girls
Rohit Pawar to Take education expenses of 100 Girls

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा उद्या (ता. २९ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांच्या पत्नीचाही उद्याच वाढदिवस आहे. या निमित्ताने रोहित पवार यांनी एक संकल्प आपल्या फेसबूक पेजवर व्हिडिओ शेअर जाहीर केला आहे. येत्या वर्षात १०० मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.

कोरोनाच्या काळात सगळे जगच अडचणीत आहे. एकमेकांच्या साथीने पुढे जाऊनच कोरोनावर मात होऊ शकते. त्यामुळे रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही एक आवाहन केले आहे. यात ते म्हणतात, "कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. आॅललाईन शिक्षण सुरु झाले आहे. पण विशेषतः ग्रामीण भागात बहुसंख्य जणांकडे स्मार्ट फोन, लॅपटाॅप, डेटा कार्ड नाही. अशांना आपल्या घरातला जुना स्मार्टफोन देता येईल का, किंवा शक्य असल्यास नवा फोन घेऊन देता येईल का, याचा विचार करा,'' असे आवाहन त्यांनी केले आहे.

''दहावीची परिक्षा झाली आहे. महाविद्यालयांचे शिक्षणही सुरु होईल. काही महाविद्यालयांनी आपली फी कमी केली. काही महाविद्यालये ती कमी करण्याचा विचार करत आहे. पण कोरोनाने अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे अनेक मुलं-मुली महाविद्यालयात जायचं का नाही, याचा विचार करत आहेत. अशांपैकी एखाद्याची फी आपल्याला भरता येईल का, हाॅस्टेलचा खर्च उचलता येईल का, याचा विचार करा,'' असेही आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. मी फक्त बोलत नाही, माझ्या परीने मी करत असतो. आपण स्वतः बारामती येथील शारदा नगर मधल्या शंभर मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

''अनेकांनी पूर्वी आपले व्यवसाय सुरु केले. त्यातून कुटुंब सावरले. व्यवसाय वाढवला. पण कोरोनामुळे अनेकजण अडचणीत आले. नैराश्यात गेले. अशांना आर्थिक मदत करता आली नाही तरी मानसिक आधार देऊन नैराश्यातून बाहेर काढण्याचा विचार करा. कोरोना झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला मानसिक आधार द्या. त्यांना मार्गदर्शन करा. आपल्या आसपास कोरोना वाॅरिअर्स आहेत. अशांना एखादे फूल देऊन त्यांचे कौतुक करा. त्यांचे मनोधैर्य वाढवा,'' असेही आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com