`या`मुळे झाले डॅा अमोल कोल्हेंचे तोंडभरुन कौतुक !

खासदार डॅा अमोल कोल्हे व त्यांच्या सहकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज तेसच शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत मालिकांच्या निर्मितीत महत्वाचे काम केले. त्यामुळे नव्या पिढीला या महापुरुषांचे कार्य समजले.
Amol Kolhe- Chhagan Bhujbal
Amol Kolhe- Chhagan Bhujbal

पुणे : छत्रपती शंभूराजेंचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी शौर्यस्थळी ‘शंभूसृष्टी’ निर्माण करण्यासाठी आणि या शौर्य स्थळाच्या विकासासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थित अभिनेते खासदार डॅा अमोल कोल्हे व त्यांच्या सहकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज तेसच शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत मालिकांच्या निर्मितीत महत्वाचे काम केले. त्यामुळे नव्या पिढीला या महापुरुषांचे कार्य समजले. त्यांच्या डॅा कोल्हे व त्यांच्या टिमने केलेले काम कौतुकास्पद आहे, त्यांच्या कामाचा मनापासून आनंद वाटला असे श्री. भुजबळ म्हणाले. 

छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक सोहळा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. शौर्यपीठ तुळापुर येथे छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराजांचा ३४१ वा राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शंभुराजे यांच्या राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून नतमस्तक होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मिळाली हे माझे भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं स्वराज्य या स्वराज्याचा विस्तार अधिकाधिक वाढविण्याचे काम छत्रपती शंभूराजे यांनी केले. स्वराज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक लढाया लढल्या त्यातील कुठल्याच लढाईत त्यांना अपयश आले नाही. सर्वच्या सर्व लढाया यशस्वी करणारे ते छत्रपती होते. 

श्री. भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले. त्यांच्यावर पहिला पोवाडा देखील त्यांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण असे काम केले. महाराष्ट्राच्या या भूमीत ज्या महापुरुषांनी समाजपरिवर्तनासाठी काम केले अशा सर्व महापुरुषांचा इतिहास हा आपल्या नव्या पिढीसमोर व जगासमोर येणे आवश्यक आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सिरीयलच्या माध्यमातून संभाजी महाराज यांच्या शौर्याची याशोगाथा घरांघरापर्यंत पोहचविली त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

यावेळी आमदार अशोक बापू पवार, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदिप कंदे, मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, उद्योगपती एल.बी.कुंजीर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे पदाधिकारी राजाराम निकम, विकास पासलकर, शिवगौरव पुरस्कार प्राप्त सावरगाव हडप गावचे पदाधिकारी अनुप मोरे, शंकर भूमकर, अनिल भुजबळ, प्रदीप कंदे, लोचन शिवले, दिपक गावडे, लतिका आव्हाळे, ज्ञानदेव सुतार, शेखर पाटील आदी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com