माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह ४१ जणांना जामीन

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने अटक झाल्यानंतरही पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया उमटली नव्हती. या संदर्भातील बातमी ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केल्यानंतर पक्षातही अस्वस्थता होती. पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आज अखेर न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला.
Yogesh Tilekar Ex MLA BJP Pune
Yogesh Tilekar Ex MLA BJP Pune

पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि पाच नगरसेवकांसह ४१ जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. ४१ जणांना झालेली अटक व त्यांना देण्यात आलेल्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीवरून भाजपांतर्गत अस्वस्थता होती. अखेर आज जामीन मिळाल्याने आज सायंकाळपर्यंत त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी या सर्वांनी जामीनासाठी अर्ज केला. माजी आमदार टिळेकर यांच्यासह सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, ऋषाली कामठे, वीरसेन जगताप व मनिषा कदम यांच्यासह ४१ जणांना अटक करण्यात आली होती.गेल्या चार दिवसांपासून सर्व पदाधिकाऱ्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अटक होऊन त्यांना

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने अटक झाल्यानंतरही पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया उमटली नव्हती. या संदर्भातील बातमी ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केल्यानंतर पक्षातही अस्वस्थता होती. पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आज अखेर न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला. 

दरम्यान, या संदर्भात बोलताना भाजपाचे पुणे शहर प्रभारी गणेश बिडकर म्हणाले, ‘‘ आमची संघटना अभेद्य आहे. पक्षात आम्ही कुणालाही वाळीत टाकलेले नाही. या प्रकरणात माजी आमदार टिळेकर तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका व कार्यकर्त्यांच्या जामीनासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील होतो. पक्ष संघटना म्हणून आम्ही एकत्रच आहोत. सर्वांचा जामीन होऊन परतल्यानंतर या आंदोलनासंदर्भातील राजकीय भूमिका आम्ही पक्ष म्हणून स्पष्ट करणार आहोत. मात्र, मी स्वत:, राजेश पांडे, संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक व महापौर मुरलीधर मोहोळ या साऱ्यांनीच या काळात जामीन मिळविण्याच्या प्रक्रियेत लक्ष घातले होते.’’
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com