पार्थ पवारांनी दिल्या अमित शहा यांना शुभेच्छा - Parth Pawar Wishesh Speedy Recovery to Home Minister Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

पार्थ पवारांनी दिल्या अमित शहा यांना शुभेच्छा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने नवी दिल्लीच्या 'एम्स' मध्ये दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे.

पुणे : कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने नवी दिल्लीच्या 'एम्स' मध्ये दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनीही काल अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अमित शहा लवकर बरे होवोत, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनीही अमित शहा यांना शुभेच्छा देताना आपणही डाॅक्टरांच्या सल्ल्याने क्वारंटाईन होत असल्याचे म्हटले आहे. अमित शहा यांना मी आदल्याच दिवशी भेटलो होतो. त्यामुळे आपणास क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सुप्रियो यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रात लिहिलेल्या अग्रलेखाद्वारेही अमित शहा यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. "अयोध्येतील भूमिपूजनानिमित्त धार्मिक विधी सुरू झाले आहेत. गणेश पूजनाची सुरुवात झाली असतानाच देशातील अनेक प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्हने आजारी पडून इस्पितळात दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना संसर्ग झाला. सध्या ते गुडगावमधील इस्पितळात पडून आहेत. राममंदिराच्या भूमिपूजनास ते जाणार होते. मंचावर बसणाऱयांच्या यादीत त्यांचे नाव होते असे म्हणतात. अयोध्येतील सुरक्षा तसेच इतर व्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर होती, पण गृहमंत्री साहेबांनाच कोरोनाने पकडावे, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे संन्यासी मुख्यमंत्री योगी महाराज व इतर निमंत्रित तर असतीलच, पण गृहमंत्री शहांशिवाय हा संपूर्ण सोहळा फिकाच पडेल. शहा यांच्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो, अशी आम्ही श्रीरामचरणी प्रार्थना करीत आहोत,'' असे या अग्रलेखात म्हटले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख