Nitesh Rane Hits Shivsena over Parner Corporators issue | Sarkarnama

भावाचे नगरसेवक फोडणाऱ्यांना 'त्या' पाचांना परत घेताना लाज वाटेल का? नितेश राणे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

२०१७च्या आॅक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. त्याचा संदर्भ देत नितेश राणेंनी पारनेरच्या घटनेवरुन शिवसेनेवर टीका केली हा. जे ऐका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले" !! , असे म्हणत राणेंनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. 

पुणे : आपल्याच भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्यांना या ५ जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? असा सवाल उपस्थित करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जबरदस्त टीका केली आहे. पारनेरचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर पुन्हा शिवसेनेत आले. या घटनेवरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

२०१७च्या आॅक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. त्याचा संदर्भ देत नितेश राणेंनी पारनेरच्या घटनेवरुन शिवसेनेवर टीका केली हा. जे ऐका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले" !! , असे म्हणत राणेंनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. 

पाच दिवसांपूर्वी शिवसेनेचे हे पाच नगरसेवक पक्षाचे माजी  आमदार विजय औटी यांच्यावर नाराज होत ते राष्ट्रवादीत गेले. या प्रवेशाच्या वेळी अजित पवार हजर होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचे चित्र होते. पारनेर प्रकरण काही महत्त्वाचे नाही, असे शरद पवार आणि संजय राऊत सांगत होते. तरी शिवसेनेत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी अजित पवार यांना फोन करून हे नगरसेवक परत देण्याची मागणी करत होते. पारनेरचा विषय राष्ट्रीय किंवा राज्याचा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली होती. 

आज मिटला महाविकास आघाडीतला तिढा

आज अखेर पारनेर प्रकरणावरून निर्माण झालेला महाविकास आघाडीतला तिढा मिटला.  शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले ते पाच नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परत पाठवले. ठाकरे यांचे दूत सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना आज अजितदादांनी मंत्रालयात बोलावून घेतले अन आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाच नगरसेवक हजर झाले. निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादीत आले. त्यांच्या पत्नी या शिवसेनेत असून त्या नगर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. 

याच पारनेर नगरसेवक प्रकरणावरुन नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्वीटर वार केला आहे.

Edited By - अमित गोळवलकर
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख