आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होणारी मोठी चूक टळली - MNS Stopped opening of Hospital To be Started by Bogus Doctor | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होणारी मोठी चूक टळली

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

शिक्रापूर येथील आधार हॉस्पिटल चे मुख्य डॉक्टर रामेश्वर बंडगर यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. बोगस डॉक्टर बंडगर याच्या नवीन दवाखान्याचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते उद्या होणार होते. हे उदघाटन पोलिसांनी तातडीने रद्द केले आहे

पुणे : शिक्रापूर येथील आधार हॉस्पिटल चे मुख्य डॉक्टर रामेश्वर बंडगर यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. आज कल्पेश यादव यांनी याबाबत निवेदन दिले होते. या निवेदना नंतर ताडीने आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर डॉक्टर वर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक पोलीस स्टेशनने या डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. 

बोगस डॉक्टर बंडगर याच्या नवीन दवाखान्याचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते उद्या होणार होते. हे उदघाटन देखील पोलिसांनी तातडीने रद्द केले आहे.  याबाबत अधिक माहिती देताना यादव म्हणाले, ''गेल्या एक महिन्यापासून याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधत होते. अशा बोगस डॉक्टर मुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत होता. याच डॉक्टरने उद्या दिनाक ३ नोव्हेंबर रोजी साईधाम रुग्णालय नावाने नवीन दवाखान्याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती मला मिळाली. ही माहिती मिळताच मी सदर बाब तातडीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी देखील याबाबत चौकशी करून सदर डॉक्टर वर तसेच आधार हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार उद्या होणार्या साईधाम हॉस्पिटलच्या उद्घाटन देखील रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये या डॉक्टर व आधार हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''    

यादव पुढे म्हणाले, ''दवाखान्यात पंचक्रोशीतील हजारो लोक उपचार घेण्यासाठी जातात, जिल्हा आरोग्य अधिकारी या नात्याने तालुका आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. आर. डी. शिंदे यांना सदर डॉक्टरवर कारवाई चे आदेश देऊन जवळपास दीड महिन्याहून अधिक काळ  उलटून गेला होता. तरी  या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली नव्हती. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हाच डॉक्टर साईधाम हॉस्पिटल नावाने नवीन दवाखाना दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी श्री. कृष्ण मन्दिर समोर, सांडभोर नगर, बजरंगवाडी शिक्रापूर त. शिरूर, जि. पुणे इथे थाटात सुरु करीत होता.  कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश असतांना सदर बोगस डॉक्टरचे हे धाडस म्हणजे आरोग्य विभागाच्या कामाला काळिमा फासणारे असून, तालुका आरोग्य अधिकारी असणाऱ्या आर. डी. शिंदे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी देखील मागणी मनविसेने केली आहे,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख