EX BJP MLA Yogesh Tilekar Tested Corona Positive | Sarkarnama

माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः टिळेकर यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. कालच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता आणखी एका भाजप नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. 

पुणे :  माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः टिळेकर यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. कालच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता आणखी एका भाजप नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. 

दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची  कोविड - १९ ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. कालच टिळेकर यांची भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खुद्द मोहोळ यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली असून आपली तब्येत उत्तम व स्थिर असल्याचा निर्वाळा दिला आहे. यातून लवकरच बरे होऊन पुणेकरांच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मोहोळ हे गेले काही दिवस सातत्याने कोरोनाच्या स्थितीचा मुकाबला आघाडीवर राहून करत होते. अनेक बैठका, रुग्णालयांना भेटी, दौरे यात ते व्यस्त होते. त्यांच्या कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही केले. महापौरांनाच लागण झाल्याने पुण्याची यंत्रणा पुन्हा आता अलर्टवर आली आहे. मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मोहोळ हे अनेक नेत्यांच्या, अधिकाऱ्यांना बैठकांना उपस्थित राहत असल्याने त्यांनाही काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासही चार नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली होती. पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेच्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण आतापर्यंत झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख